24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeपरभणीमानवत बाजारपेठेत वाहनतळा अभावी वाहने रस्त्यावर

मानवत बाजारपेठेत वाहनतळा अभावी वाहने रस्त्यावर

एकमत ऑनलाईन

मानवत: मानवत शहरातील बाजारपेठेत वाहनतळा नसल्याने रस्त्यावरच मोठ्या संख्येने वाहने उभी राहत असल्याने रहदारीचा प्रश्न गंभीर बनला असून व्यापारी, पादचा-यासह वाहनधारकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. मानवत शहर हे तालूक्याचे ठिकान असल्यामूळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात ग्रामिण भागातील नागरीक, व्यापारी , शेतकरी आपले कामे करण्यासाठी शहरात येत असतो.

मानवत शहर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले शहर असून त्यामूळे शेकडो वाहणे शहरात येत असतात त्या मूळे शहरात वाहणाची रेलचेल असते. शहरात वाहन तळ नसल्याने वाहण चालक-मालक हे आपली वाहणे शहरातील मुख्य रस्त्याच्या बाजूला उभी करून व्यापारपेठेत फेरफटका मारतात. त्यामुळे रस्त्यात उभी राहणा-या वाहनामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्याच बरोबर पादचा-यांनाही अडचणींचा सामना करावा लागत असुन वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे.

शहरात अवजड वाहनाना बंदी असून ही अवजड वाहणे शहरात मूक्त संचार वाढल्यामूळे अपघाताचा धोका वाढला आहे. शहरात उभ्या असणा-या वाहनांची चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरीकातून होत आहे.

यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार डाॅ.सायरस पुनावाला यांना जाहीर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या