23.9 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home परभणी विजय जोशी यांचे आणिबाणी हे पुस्तक इतिहासच...

विजय जोशी यांचे आणिबाणी हे पुस्तक इतिहासच…

एकमत ऑनलाईन

परभणी : ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी यांनी अणीबाणीच्या कालखंडावर, संघर्षावर अनुभवातून लिहिलेल्या अणीबाणी… लोकशाहीला कलंक हे पुस्तक अणीबाणीचा इतिहासच आहे, असा सूर मान्यवर वक्त्यांनी एका परिसंवादातून व्यक्त केला. हे पुस्तक नव्या पिढीसाठी निश्र्चितच दिशादर्शक व प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही व्यक्त केला. शिवाजी नगरातील मराठवाडा हायस्कूलमध्ये शनिवारी (दि. 23) सायंकाळी चपराक प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या व विजय जोशी यांनी लिहिलेल्या अणीबाणी लोकशाहीला कलंक…. या पुस्तकावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भारतीय किसान संघाचे क्षेत्रीय संघटनमंत्री दादा लाड अध्यक्षस्थानी तर अ‍ॅड.गणेशराव दुधगावकर, लोकतंत्र सेनानी समितीचे राज्याध्यक्ष रघुनाथराव दीक्षित हे प्रमुख पाहुणे, अ‍ॅड.विजय गव्हाणे, ज्येष्ठ पत्रकार शरद देऊळगावकर, साहित्यिका अर्चना डावरे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. चपराक प्रकाशन पुणे व दिलासा प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पुस्तकाच्या माध्यमातून इतिहासातील सत्य घटना आजच्या तरूण पिढीसमोर ताज्या झाल्या आहेत. म्हणूनच अणीबाणी हे पुस्तक म्हणजे ऐतिहासिक दाखला ठरणारे आहे. या पुस्तकातून तत्कालीन परिस्थिती, त्यावेळचा संघर्ष, लोकतंत्रसेनानींसह त्यांच्या कुटूंबियांनी झेललेल्या अपरिमित अत्याचारासह लोकशाहीच्या झालेल्या अपमानाबाबत तटस्थपणे वस्तुनिष्ठ व परखड अशी मांडणी केली असल्याचे मत सौ.डावरे, श्री. देऊळगावकर व अ‍ॅड. गव्हाणे यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात दादा लाड यांनी अणीबाणीच्या त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाने बजावलेल्या भूमिका निर्णायक ठरल्या.चे सांगितले.

लेखक विजय जोशी यांनी भाषणातून पुस्तकामागील भूमिका विशद केली. प्रास्ताविक चपराकचे सर्वेसर्वा घनश्याम पाटील यांनी केले. प्रकाशनाची वाटचाल तसेच पुस्तक प्रकाशनामागील भूमिका विशद केली. सूत्रसंचालन प्राचार्य अनंत पांडे, मुख्याध्यापिका सौ.मृदूल धारासूरकर यांनी केले. आभार संतोष धारासूरकर यांनी मानले. कार्यक्रमास नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रजासत्ताक भारताचा प्राणवायू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या