चारठाणा : येथिल संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक गुरुवर्य ह.भ.प.नामदेव महाराज ढवळे चारठाणकर यांनी वयाच्या ६५ वर्षानंतर बायपास सारखी शत्रक्रिया होउनही ०४ महिने ०६ दिवसात ३६६५ किलोमीटरचे अंतर पायी चालून आपल्या १८ सहका-यांसह नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. त्यांचे या परिक्रमेनंतर शहरात २१ फेब्रुवारी रोजी आगमन होताच ढोल-ताशे, बँडपथक, लेझीम, टाळ-मृदंग, फटाक्यांची आतिषबाजी करत गावातील बसस्थानक-गोकुळेश्वर मंदिर-पेठ विभागातील मुख्य रस्त्याने वारकरी शिक्षण संस्थेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच अनिरुद्ध चव्हाण, उपसरपंच वाजेद कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य दौलत देशमुख, तहेसिन देशमुख, स.रहेमत आली, शिवशंकर तमशेट्टे आदींनी स्वागत केले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश नागरे यांनी महाराजांसह सोबत गेलेल्या १८ जनांचे स्वागत केले. तर मीनाताई नानासाहेब राऊत या दांपत्याने महारांचे स्वागत करत जे.सी.बीच्या सहाय्याने फुलांची उधळण केली. काझी हॉस्पिटल येथे डॉ.आझर काझी, आथर काझी, आलिमोद्दीन काझी यांनी स्वागत केले. केंद्रीय कन्या, जिल्हा परिषद प्रशाला व उर्दू शाळेच्या वतिने विद्यार्थ्यांनी लेझीम खेळत शिक्षक व शिक्षकांनी शाल, श्रीफळ देत औक्षण करून स्वागत केले. पत्रकार संघाच्या वतीने स. मुस्ताक, आबेद देशमुख, प्रभाकर कुर्हे, एकनाथ चव्हाण, एकनाथ आवचार, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉ.राठोड, पाटेकर, सातपुते, मुंजे, शे.ईसाकोद्दीन, डॉ. प्रकाशचंद कोठारी, डॉ. जयकांत हाके, डॉ. राजकुमार पोकर्णा, पियुष कोठारी, नरोत्तम शिक्षण संस्था, उत्तमोत्तम जोगवाडकर शाळा, गावातील दुकानदार, वेगवेगळ्या संस्था, संघटना, पक्ष आणी मुस्लिम बांधव यांच्याकडून सुध्दा जागोजागी स्वागत करण्यात आले.
नागरिकांनी घराघरासमोर औक्षण करून शाल, श्रीफळ व हार घालून पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले. यावेळी गावातील रस्त्यावर रांगोळी व पुष्प अंथरून स्वागताची तयारी करण्यात आली होती. या मिरवणुकीत गावातील नागरिकांसह, महिला, चिमुकले, टाळकरी भजनीमंडळ आदींनी सहभाग नोंदवला होता. या मिरवणुकीची वारकरी शिक्षण संस्था येथे सांगता झाली. या वेळी हजारो नागरिक, भाविक उपस्थित होते.