परभणी,दि.18(प्रतिनिधी) : परभणी शहर महानगरपालिकेचे प्रशासक आयुक्त देविदास पवार यांचे परभणी शहरातील नाट्य कलावंतांकडून पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी नटराज रंगमंदिर तसेच नवीन नाट्यगृह सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावर्षी राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांचा परभणीकरांसाठी भारतीय स्वांतंर्त्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी आयुक्तांकडे करण्यात आली. याप्रसंगी नाट्यनिर्माते संजय पांडे, नाट्य दिग्दर्शक विनोद डावरे, नाट्य कलावंत प्रकाश बारबींड, प्रमोद बल्लाळ, ऐश्वर्या डावरे, बंडू जोशी व श्रीकांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती