25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeपरभणीपुर्णेत पाणी टंचाई असताना न.प.चा वर्धापन दिन जल्लोषात

पुर्णेत पाणी टंचाई असताना न.प.चा वर्धापन दिन जल्लोषात

एकमत ऑनलाईन

पूर्णा : शहरात नळाला गेल्या आठ दिवसांपासून पाणी न सुटल्याने शहरातील नागरीक पाणी टंचाईचा सामना करीत असताना याकडे लक्ष देण्याऐवजी नपाचे मुख्याधिकारी आपल्या कार्यालय इमारतीचा वर्धापन साजरा करण्यात मग्न असल्याचे चित्र पाहून नागरिकांतून रिकातुन संताप व्यक्त होत आहे.

पूर्णा शहरात नगर परिषद द्वारा पाणी पुरवठा करण्यात येतो. आधीच जागोजागी थेट पाईपलाईन फोडून नळ कनेक्शन देण्यात आल्याने नदीतून पाण्याचा टाकी भरण्यासाठी बरेच वेळ लागत आहे. दोन- तीन दिवस आड पाणी पुरवठा टप्प्याने करण्यात येतोÞ परंतु गेल्या आठ दिवसांपासून मोटारची साफ्ट बिघडल्याने मोटार बंद पडली आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून नळाला पाणी न सूटल्याने शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहेÞ

त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. मुख्याधिकारी अजय नरले यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित मोटारींचा साफ्ट बसवून पाणी पुरवठा कशा प्रकारे लवकरात लवकर सुरळीत करता येईल याकडे लक्ष देण्याऐवजी नगर परिषदेच्या बांधण्यात आलेल्या ईमारतीस मंगळवार दि. १५ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे नपा कार्यालयास सजवुन वर्धापन साजरा करून जल्लोष साजरा करीत आहेत. त्याना नागरिकांच्या समस्या आणि शहरातील पाणी टंचाईशी काही देणे घेणे नसल्याचे पाहून नागरिकांतुन त्यांच्या विरोधात संताप व्यक्त होताना दिसत आहे. त्याच बरोबर त्याच्या काळात झालेल्या सर्व कामाची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या