22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeपरभणीसंजय गांधी निराधार विभागाची कधी होणार चौकशी

संजय गांधी निराधार विभागाची कधी होणार चौकशी

एकमत ऑनलाईन

महालिंग भिसे गंगाखेड : तहसील कार्यालयाअंतर्गत संजय गांधी योजना विभाग वृद्ध ,निराधार ,अपंग, विधवा व परित्यक्ता महिला व पुरुषांना आधार म्हणून ५०० ते ६०० महिना अनुदान सुरु करताना अर्ज दिल्यानंतर मंजुरीसाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे गंगाखेड येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल साबणे व उत्तम काळे यांनी निराधारांच्या प्रश्नाला वाच्या फोडण्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या १४ तारखेला विविध मागण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा दिल्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार यांना ३० तारखेला पत्र देऊनही गंगाखेड तहसीलदार यांनी काही चौकशी करण्यात आली नाही.

संजय गांधी योजना विभागाचा नागरिकांना अनुदानाच्या मंजूरीसाठी दारिद्यर्रेषेचे प्रमाणपत्र बंधनकारक असताना ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही अशांना परिशिष्ट १३ प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र ऑफलाईन जास्तीचे पैसे घेऊन दिल्या जात आहे त्यामुळे सधन लोकांना या योजनेचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइनच्या काळात ऑफलाईन प्रमाणपत्र संबंधित दलालामार्फत दिले जाते परिसरात दलालांचा सुळसुळात झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गरीब गरजूंना देण्यासाठी आदेशित करावे असे निवेदक आणि म्हटले आहे. अन्यथा उपविभागीय कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिना पूर्वी आमरण उपोषणास बसू असे कळविले आहे.

Read More  अण्णाभाऊंना भारतरत्नच्या मागणीसाठी जलसमाधीचा प्रयत्न

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या