26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeपरभणीइंजेक्शन सदृश सिरींजमधून चॉकलेटची सर्रास विक्री

इंजेक्शन सदृश सिरींजमधून चॉकलेटची सर्रास विक्री

एकमत ऑनलाईन

परभणी : लहान मुलांचे खाद्य पदार्थ बनावणा-या कंपन्या नेहमीच विविध आकारात खाद्य पदार्थ उपलब्ध करून देत लहान मुलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात़ याच पार्श्वभुमीवर एका कंपनीने चक्क चॉकलेट विक्रीसाठी इंजेक्शन सिरींज सदृष्य वस्तुचा वापर केला आहे़ यामुळे बच्चेकंपनी या चॉकलेटकडे आकर्षक होत असली तरी अशा प्रकारे इंजेक्शन सदृष्य सिरींजमधून चॉकलेट विक्री करणे धोकादायक असल्याचे मत नागरीकातून व्यक्त होत आहे़

विदेशात लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकणा-या वस्तुंमधून खाद्य पदार्थ विक्री करण्यास निर्बंध आहेत़ परंतु आपल्याकडे लहान मुलांचा कोणताही विचार न करता बाहुल्या, सायकल किंवा विविध आकाराच्या वस्तूमधून खाद्य पदार्थाची सर्रास विक्री होत असताना आपल्याला दिसून येते़ लहान मुले देखील वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे या खाद्य पदार्थांची खरेदी करण्यासाठी आग्रह धरताना दिसून येतात़ या पार्श्वभुमीवर एका कंपनीने चक्क चॉकलेट विक्रीसाठी इंजेक्शन सदृष्य सिरींजचा वापर केला आहे.

इंजेक्शनच्या सिरींजमध्ये चॉकलेट भरून ते बाजारात विक्रीसाठी आणले आहे़ लहान मुलांमध्ये देखील इंजेक्शनबद्दल कुतूहल असल्याने ते अशा पध्दतीच्या इंजेक्शन सदृष्य सिरींजमधील चॉकलेट खरेदीसाठी आपल्या पालकांकडे आग्रह धरताना दिसून येत आहेत़ परंतू अशा प्रकारे इंजेक्शन सदृष्य सिरींजमध्ये भरून विकण्यात येणारे चॉकलेट लहान बालकांसाठी घातकही ठरू शकते अशी भिती पालकांमधून व्यक्त होत आहे.

या संदर्भात अन्न भेसळ अधिकारी सरकटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ परंतू त्यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही़

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या