परभणी : शहरातील वसमतरोड महामार्गावरील शिवाजीनगर परीसरात गुरूवार, दि़०९ जून रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एक लिंबाचे झाड अचानक कोसळले़ या कोसळलेल्या झाडाखाली दोन दुचाकी चालकांसह एक अॅटो सापडला़ सुर्देवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही़
परभणीहून वसमतकडे जाणा-या महामार्गावर गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शिवाजीनगर येथील जुन्या खासदार कार्यालय जवळ असलेले एक लिंबाचे झाड अचानक कोसळले़ त्यामुळे या रस्त्यावरून जात असलेल्या दोन दुचाकीसह एक अॅटो या झाडाखाली सापडला़ सुर्देवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही़ दरम्यान या घटनेमुळे झाड पडल्यानंतर तास -दीड तास या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ शहर वाहतूक शाखा पोलिस आणि मनपा कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन झाडाच्या फांद्या तोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली़ यावेळी नागरीकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती़