27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeपरभणीचुडावा येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

चुडावा येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

पुर्णा : शेतात काम करणाºया एका ५५ वर्षीय महीलेला विषारी सापाने चावा घेतल्याने तीचा मृत्यू झाल्याची घटना पुर्णा तालुक्यातील चुडावा शिवारात काल शनिवार रोजी घडली याप्रकरणी चुडावा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या बाबत चुडावा पोलिसां कडून मिळालेली माहीती अशी कि,मिनाबाई भ्र.बळीराम कांबळे वय ५५ रा.चुडावा रेल्वे स्थानक परिसर असे त्या मयत महीलेचे नांव आहे.

सदरीरु महीला ही शेतात मोलमजुरी चे काम करुन आपली उपजीविका भागवत असे शनिवारी ता.१९ रोजी मिनाबाई कांबळे ह्या नेहमीप्रमाणे चुडावा शिवारातील शेतकरी सुनिल दिगंबर देसाई यांच्या शेतात काम करण्यासाठी गेल्या असता. दुपारी शेतात काम करीत असताना शेतातच त्यांच्या हाताला एका विषारी सापाने चावा घेतला. ही माहिती त्यांनी शेतातील नागरिकांना दिली.त्यानंतर मिनाबाई यांना या नागरिकांनी तातडीने उपचारासाठी नांदेड येथील श्री गुरु गोविंदसिंग शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच मिनाबाई कांबळे यांचा मृत्यू झाल्याची माहीती मिळाली.

Read More  RBIच्या सूचनेनुसार देशात 5 पेक्षा जास्त सरकारी बँका नकोत

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या