22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeपरभणीवारकरी आणि शेतकरी महाराष्ट्राचा श्वास आहे : हभप जोशी महाराज

वारकरी आणि शेतकरी महाराष्ट्राचा श्वास आहे : हभप जोशी महाराज

एकमत ऑनलाईन

कौसडी : जीवन जगत असताना गरजावंत वस्तू उपलब्ध करून देण्याचे काम शेतक-याकडून होत आहेÞ त्यामुळे माणसाचे आरोग्य चांगल्या पद्धतीने काम करीत आहेÞ तसेच वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्रात संस्कृती जोपासण्याचे काम सुरू आहेÞ त्यामुळे महाराष्ट्राचा खरा श्वास म्हणून या दोन घटकांना ओळखले जाते यासाठी शेतक-यांनी पिकवलेले धान्य, भाजीपाला व इतर गोष्टी उपलब्ध झाल्यामुळे सर्वसामान्य माणसांना जीवन जगणे सोपे झाले आहे, असे प्रतिपादन हभप अमृत महाराज जोशी यांनी काल्याच्या कीर्तन प्रसंगी केले.

जिंतूर तालुक्यात कौसडी येथे सुरू असलेल्या भागवत सप्ताहाची सांगता रविवार, दिÞ१३ रोजी करण्यात आलीÞ या निमित्त अमृत महाराज जोशी बीड यांचे काल्याचे किर्तन संपन्न झालेÞ या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी कौसडी बोरी परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होतीÞ या सांगता प्रसंगी सकाळी गावातून भव्य ग्रंथ ंिदडी काढण्यात आली. या ंिदडीत लेझीम, बँड, फुगड्या आदीचा सहभाग होताÞ कौसडी ग्रामस्थांच्यावतीने गेल्या २८ वर्षांपासून या भागवत शब्दाची परंपरा असून या निमित्त सर्व जाती धर्मातील नागरिक एकत्र येऊन भवे दिव्य कार्यक्रम साजरा केला जातोÞ या भागवत सप्ताह प्रसंगी खाजगी वाहतूक संघटनेच्या वतीने भाविकांना आणण्यासाठी मोफत प्रवास सेवा देण्यात आलीÞ यासाठी एकूण ४० गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होतीÞ ही वाहतूक सेवा मोफत दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने चालक-मालक संघटनेचा सत्कार करण्यात आला

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या