26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeपरभणीकोरोनाबाधित रूग्ण गिरवताहेत योगाचे धडे

कोरोनाबाधित रूग्ण गिरवताहेत योगाचे धडे

एकमत ऑनलाईन

परभणी : रा.स्व.संघ जनकल्याण समितीने शहरातील अक्षदा मंगल कार्यालयातील कोविड केअर सेंटर मधील कोरोनाग्रस्तांसाठी ९ मे पासून सात दिवसीय समुपदेशन व योग वर्गास सुरूवात केली. कोरोनाबाधित रू ग्णही मनापासून योगाचे धडे गिरवत असल्याने त्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होत आहे.

जनकल्याण समितीद्वारे आपत्ती विमोचन आयामा अंतर्गत फोनवरून समुपदेशन करणे, रूग्णांना डब्बे पुरविणे, लसीकरण, रक्तदान व प्लाज्मा दानाविषयी जनजागृती करणे व मदत करणे हे कार्य करण्यात येत आहे. परभणी शहरातील महापालिकेअंतर्गत अक्षदा मंगल कार्यालयात कार्यरत कोरोना केअर सेंटरमधील रूग्णांना समुपदेशन व योग वर्ग घेण्यात येत आहेत. यासाठी सकाळी ७ ते ८ यावेळेत रूग्णांकडून निरामय योग केंद्राने कोरोना काळातील निश्चीत केलेल्या अभ्यासक्रमातील योगाची प्रात्यक्षिक करून घेतली जात आहेत. यासाठी निरामय योग केंद्राचे योग शिक्षक डॉ.धीरज देशपांडे, वर्षा रामपुरकर व श्रुती वैद्य हे मार्गदर्शन करत आहेत. कोरोनाबाधितांच्या मनोरंजनासाठी विविध खेळ, कोडी, हास्य योग, प्रार्थना घेतली जात आहे. या सर्व कार्यक्रमामुळे रुग्णांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम होत आहे.

यासाठी जनकल्याण समितीच्या सुरेखा दराडे, सुनिता तालखेडकर, क्रांतीताई हमदापुरकर, श्रीलेखाताई वझे, विजय पेशकार, पुनम श्रीरामवार, शुभदा दिवाण, प्रदीप साखरे, दत्ताजी चट्टे, रवि पेशकार प्रयत्न करत आहेत. मनपा उपायुक्त जगताप व वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना सावंत, समितीचे अध्यक्ष डॉ.राजगोपाल कालानी, उपाध्यक्ष रेखाताई हरदास, सुभाष कुलकर्णी, प्रशांत बारस्कर, रा.स्व.संघ जनकल्याण समितीचे विभाग कार्यवाह आशिष निलावार व रा.स्व.संघाचे कार्यवाह माणिक माटे , सहकार्यवाह अभिजीत अष्टुरकर सहकार्य करत आहेत.

रेल्वे कर्मचाऱ्यांवर कोरोनाचे सावट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या