27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeपरभणीआप परभणीतील सर्व नगरपालिका लढवणार

आप परभणीतील सर्व नगरपालिका लढवणार

एकमत ऑनलाईन

जिंतूर : आम आदमी पार्टी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका निवडणुका लढवणार आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिंतूर येथे आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यात ही घोषणा करण्यात आली.

या मेळाव्यास पार्टीचे परभणी जिल्हाध्यक्ष परमेश्वर यादव, जिल्हा सचिव ऍड.सुरेश चौधरी, जिल्हा युवाध्यक्ष ऍड. सुनील बुधवंत, जिंतूर तालुकाध्यक्ष ऍड. मोहसिन पठाण, कुंभारीचे माजी सरपंच वैजनाथ झूमडे उपस्थित होते. या मेळाव्यात नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग निहाय चाचणी करून योग्य नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तालुका व शहर कार्यकारिणीने जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे यादव म्हणाले.
प्रारंभी पत्रकार परिषदेत ऍड. सुरेश चौधरी यांनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन व स्वच्छ राजकारण करण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. तर पठाण यांनी आप दिल्लीच्या स्तरावरील सुविधा जिंतूरमध्ये देणार असून त्या संदर्भातील विकास पत्रिका १५ दिवसात प्रकाशित करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमात यादव यांनी ऍड. सुनील बुधवंत यांची पक्षाच्या युवा जिल्हाध्यक्षपदी, तर सादिया बेगम शेख मतीन यांची जिंतूर महिला शहराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या