परभणी : पाथरी तालुक्यातील सिमुरगव्हाण येथे एका युवकाचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार, दि.३१ मे रोजी सायंकाळी घडली. सिमुरगव्हाण कॅम्प जवळील कालव्यावर काही मित्र पोहण्याकरीता गेले होते. यावेळी दशरथ गवारे (वय १९) या युवकास पोहता येत नसताना सुध्दा मित्रांनी कालव्यात ढकलले. त्यामुळे कालव्यातील पाण्यात बुडून गवारे याचा मृत्यू झाला. कालव्यातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर गवारे हा युवक वाहून गेला. दरम्यान, मानवत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील झरी शिवारातील कालव्यात गवारे याचा मृतदेह आढळून आला. गणेश बापुराव उगले यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलिस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.