23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeपरभणीझायगोग्रामा भुंग्‍याव्‍दारे गाजर गवताचा समूळ नायनाट करू शकतो : कुलगुरू डॉ़इन्‍द्र

झायगोग्रामा भुंग्‍याव्‍दारे गाजर गवताचा समूळ नायनाट करू शकतो : कुलगुरू डॉ़इन्‍द्र

एकमत ऑनलाईन

– म‍णिवनामकृवि येथे गाजर गवत निर्मुलन जागृती सप्ताह संपन्‍न
परभणी : झायगोग्रामा भुंग्याद्वारे पर्यावरणाचे कोणतेही नुकसान न करता गाजर गवताचा समूळपणे नायनाट करू शकतो़ या भुंग्याची संख्या मोठया प्रमाणात नैसर्गिकरित्या वर्षानुवर्ष वाढत राहते. विद्यापीठात उपलब्ध झायगोग्रामा भुंगे शेतकरी बांधवाच्‍या शेतात तसेच गाव परिसरात सोडून शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ.इन्द्र मणि यांनी केले़.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परोपजीवी कीटक संशोधन योजना आणि कृषि कीटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गाजर गवत निर्मुलन जागरूकता सप्ताह निमित्त दि़. ऑगस्‍ट रोजी कुलगुरू डॉ.इन्द्र मणि यांच्या हस्ते ज्वार संशोधन केंद्राच्‍या परिसरात गाजर गवतावर उपजीवीका करणारे झायगोग्रामा भुंगे (मेक्सिकन बिटल) गाजर गवतावर सोडण्‍यात आले.

यावेळी कुलगुरू डॉ़इन्द्र मणि बोलत होते़ कार्यक्रमास संचालक संशोधन डॉ.दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ.सय्यद ईस्माईल, कुलसचिव डॉ.धिरजकुमार कदम, कृषि कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ़पुरूषोत्‍तम नेहरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

झायगोग्रामा भुंग्यांचा वापर करुन गाजर गवताचे जैविक पध्दतीने निर्मुलन बाबत माहिती परोपजीवी कीटक संशोधन योजनच्‍या प्रभारी अधिकारी डॉ.श्रध्दा धुरगुडे यांनी दिली. सदरील झायगोग्रामा भुंग्याचे विद्यापीठातील परोपजीवी कीटक संशोधन योजनेतील प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर गुणन केले जाते.

शेतक-यांना नाममात्र दरात ते उपलब्ध करून देण्याचे काम मागील ब-याच वर्षापासून सुरु आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांची ह्या भुंग्याला मोठया प्रमाणात मागणी होत आहे. यास शेतक-यांचा दरवर्षी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद असतो. या वर्षी सुध्दा शेतक-यांनी याचा लाभ घेण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

विद्यापीठातील विविध महाविद्यालयाच्‍या माध्‍यमातुन दि़१६ ते २२ ऑगस्ट दरम्‍यान गाजर गवत निर्मुलन जागरूकता सप्‍ताहा साजरा करून जगजागृती करण्‍यात आली. कार्यक्रमास सहाय्यक परोपजीवी शास्त्रज्ञ डॉ. श्रद्धा धुरगुडे, डॉ.पुरुषोत्तम झंवर, डॉ.एस.एस.गोसलवाड, डॉ.मो. ईलीयास, डॉ.पी.एच. वैद्य, डॉ.गजानन गडदे, डॉ.कमलाकर कांबळे, डॉ.मिलिंद सोनकांबळे, डॉ.अनंत लाड, डॉ.डिगांबर पटाईत, डॉ.के.डी. नवघरे, डॉ.फारिया खान, गणेश खरात, डॉ.राजरतन खंदारे, डॉ.संजोग बोकन, डॉ.योगेश म्हात्रे, धनंजय मोहड, अनुराग खंडारे, मधुकर मांडगे बालाजी कोकणे, दिपक लाड, योगेश विश्वांभरे आदीसह कीटकशास्त्र विभागातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या