संसदेचे कामकाज संस्थगित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचे कामकाज केवळ एक मिनिट चालले. सभापती ओम बिरला यांनी वंदे मातरम् गाण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले. पीएम मोदी-शाह, संपूर्ण मंत्रिमंडळ आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेत उपस्थित होते. दुसरीकडे आज संसद परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी आंदोलन केले.

संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलै रोजी सुरू झाले होते. सुरुवातीपासूनच संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरले. अधिवेशन सुरू झाल्यापासून जंतरमंतर येथील आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेली पोलिस कारवाई आणि राम मंदिरातील लुटीवरून विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला. अधिवेशनाच्या अखेरपर्यंत विरोधकांनी विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मुद्दा लावून धरत लाठीहल्ल्याचा आदेश नेमका कुणी दिला, याचे उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात द्यावे, अशी मागणी केली. यावरून संसदेत आणि संसदेबाहेर सत्ताधारी आणि विरोधकांत संघर्ष पाहायला मिळाला. अखेरच्या दिवशी तरी गृहमंत्री उत्तर देतील, अशी अपेक्षा होती. परंतु अखेरच्या दिवशी आज लोकसभेचे कामकाज केवळ १ मिनिट चालले. त्यानंतर कामकाज संस्थगित करण्यात आले. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले.

लोकसभेत सकाळी कामकाजाची सुरुवात गदारोळात झाली. परंतु नंतर वंदे मातरमच्या घोषणेने काही काळासाठी शांतता प्रस्थापित झाली. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचेही आज आगमन झाले. तथापि, त्यानंतर सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. दरम्यान, झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात एनडीएच्या खासदारांनी आंदोलन केले. राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडमधील हल्द्वानीत त्यांच्या कार्यक्रमानंतर झालेल्या शुद्धीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. सभागृहात एमएमडीआर दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. यानंतर कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.

लोकसभेत ११४ पैकी ९६ तास कामकाज नाही
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात १९ बैठका झाल्या. सभागृहाचे कामकाज साधारणपणे सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत चालते. दुपारी १ ते २ या वेळेत जेवणाची सुटी असते. याचा अर्थ दिवसाला अंदाजे ६ तासांचे कामकाज चालते. यानुसार १९ बैठकांमध्ये अंदाजे ११४ तासांचे कामकाज होणे अपेक्षित होते. परंतु केवळ सुमारे १७ तास आणि ३० मिनिटांचेच कामकाज झाले. याचा अर्थ अंदाजे ९६ तास आणि ३० मिनिटे कामकाज कमी झाले.

सत्ताधारी-विरोधक यांच्यात संघर्ष सुरूच
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एनडीए आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमधील संघर्ष सुरूच होता. गुरुवारी दोन्ही बाजूंचे खासदार एकमेकांशी भिडले, ज्यामुळे जोरदार घोषणाबाजी झाली. सुरक्षा रक्षक ढालीप्रमाणे मध्ये उभे होते.

गृहमंत्री लपून बसले : वेणुगोपाल
काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. ते लोकसभा अध्यक्षांना प्रेमपत्र का लिहित आहेत? ते सभागृहात येऊन सदस्यांना आपली मते का समजावून सांगत नाहीत? ते या सगळ््याला का घाबरत आहेत? गृहमंत्री सभागृहात येऊन म्हणाले पाहिजेत, मला चर्चा करायची आहे, मी उत्तर द्यायला तयार आहे. पण त्याऐवजी ते पूर्णपणे लपून बसले आहेत.

हे मी पहिल्यांदाच पाहतेय : प्रियंका गांधी
एनडीए खासदारांच्या आंदोलनाचा संदर्भ देत काँग्रेस खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या, असे दृश्य आम्ही पहिल्यांदाच पाहतोय. टीएमसी खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या की, १२ वर्षे सत्तेत असलेले सरकार आता गायब झाले. मी इतका निरुपयोगी संसदीय कामकाज मंत्री कधीच पाहिला नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13
Video thumbnail
BIG BREAKING | तिरुका नदीत जळकोटच्या व्यक्तीचा मृतदेह; मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
00:57
Video thumbnail
SOLAPUR|पडळकरांचा ताफा अडवला! मराठा आंदोलकांचा थेट सवाल; आरक्षणावर आमदारांनी स्पष्ट केली भूमिका
01:42
Video thumbnail
LATUR|गवळणीच्या सुरांनी लातूर दुमदुमलं! वासुदेव समाजाचा जन्माष्टमी सोहळा थाटात
03:55
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
08:14
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर ट्रॅफिक पोलिसांचे मिशन ऑल आऊट! फटाका सायलेंसर, रॉंग साईड, मोबाईलवर कारवाई
02:01
Video thumbnail
BIG BREAKING | लातूर पोलिसांचा धडाका! ५९ हरवलेले मोबाईल शोधून मालकांना परत
03:31
Video thumbnail
Nanded Maratha Protest|मराठा रॅलीत आमदारांना धक्का! घोषणाबाजीनंतर काढता पाय
02:26
Video thumbnail
Latur|ऑक्टोबरमध्ये रंगणार थरार; लातूरच्या खेळाडूंची तयारी पाहा
03:24
Video thumbnail
Latur | लांबच्या प्रवासातील महिलांचे हाल संपणार? पेट्रोल पंपांवर स्वच्छ शौचालयांसाठी मोठा पुढाकार
05:46
Video thumbnail
BIG BREAKING | मराठा आरक्षणासाठी बोरगाव काळेत उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार
00:32
Video thumbnail
BIG BREAKING | नांदेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद! सकाळपासून बाजारपेठा बंद, मराठा समाजाची मोठी रॅली
00:51

Latest news