24.1 C
Latur
Monday, June 24, 2024
Homeसोलापूररेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांची एस टी स्थानकावर गर्दी

रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांची एस टी स्थानकावर गर्दी

सोलापूर : सोलापूरहून दररोज पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाच हजार तर मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दोन हजार इतकी आहे. सोलापूरमार्गे मुंबईला जाणाऱ्या तीन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची धांदल उडाली. शनिवारी रेल्वे स्थानकासह एस. टी. स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. तर खासगी बसेसही हाऊसफुल्ल धावू लागल्या होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे २४ डब्यांच्या गाळ्यांना सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म नं. १० व ११ चे विस्तारीकरण सुरू आहे, या प्री नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे शनिवार, रविवार असे दोन दिवस रेल्वेच्या वेळा आणि मार्गामध्ये विस्कळितपणा आला आहे. सोलापुरातून दररोज पुणे व मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारण सहा हजार इतकी आहे. यात रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ही ८५ टक्के इतकी आहे. सिद्धेश्वर एक्स्प्रेस ही मुंबईला जाणारी हक्काची रेल्वे आहे. ती गेली दोन दिवसांपासून पुण्यापर्यंत धावत आहे.

शनिवारी मात्र चार एक्स्प्रेस रद्द करण्यात होते. रविवारीदेखील हीच परिस्थिती आहे. आता शाळा व महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने उन्हाळी सुटी संपवून प्रवासी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. अशातच रेल्वेच्या वेळा व मार्ग विस्कळित झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली, रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची माहिती प्रवाशांना दिली गेली नसल्याने रेल्वे स्थानकावर शनिवारी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

सोलापूरहून पुणे-मुंबईकडे जाणारे आणि मुंबई-पुण्याहून सोलापूर येणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली. सीएसटीवरून केवळ दादरपर्यंत गाड्या धावल्या आहेत. तर सोलापूरहून काही गाडया पुण्यापर्यंतच सोडण्यात आले. तर तोन एक्स्प्रेस रद्द केले होते. त्यामुळे प्रवाशांनी एस.टी. महामंडळ बसेस आणि खासगी ट्रॅव्हल्स गाडयांचा आधार घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR