दुष्काळग्रस्तांसाठी पवारांच्या मुख्यमंत्र्यांकडे १७ मागण्या

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्य सरकारकडे १७ प्रमुख मागण्या केल्या आहेत. दुष्काळात होरपळणा-या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी केली. तसेच दुष्काळाच्या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे ३ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, असा आग्रहही शरद पवारांनी धरला.

शरद पवार यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्राची माहिती शेअर करताना म्हटले की, महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना तातडीचा दिलासा मिळणे गरजेचे आहे. या संकटाचा गांभीर्याने विचार करून सरकारने दसरा-दिवाळीपूर्वी मदत त्यांच्या खात्यात जमा करावी. दुष्काळातील विविध समस्यांवर सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी विधिमंडळाचे ३ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी शरद पवार यांनी पत्राद्वारे शासनाकडे १७ प्रमुख मागण्या केल्या आहेत.

यामध्ये निकषांत बसलेले आणि वंचित राहिलेले इतर सर्व तालुके तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करा, दुष्काळग्रस्त भागातील संपूर्ण जमीन महसूल पूर्णपणे माफ करा, शेती कर्ज, सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज, अल्पसंख्याक/आदिवासी विभागाचे वैयक्तिक कर्ज, फळबाग कर्ज आणि महिला बचत गटांचे सर्व कर्ज संपूर्ण माफ करा, कृषी पंपांची थकबाकीसह सर्व वीज बिले माफ करा, दुष्काळग्रस्त भागातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी, वसतिगृह फी आणि मेस फी पूर्ण माफ करा, रोजगार हमी योजनेच्या निकषांत शिथिलता आणून मागेल त्याला ३ किमी परिसरात तातडीने काम उपलब्ध करून द्या.

यासोबतच टँकर मंजुरीचे अधिकार कलेक्टरऐवजी तहसीलदारांना देण्यात यावेत, अशी मागणी केली. तसेच शेतक-यांच्या कृषी पंपांची वीज अजिबात खंडित करू नका आणि लोडशेडिंग तात्काळ थांबवा. प्रत्येक शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबाला दरमहा २५ किलो धान्य मोफत वाटप करा, अडचणीत आलेल्या शेतक-यांच्या जनावरांच्या चा-यासाठी थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करा, जलसंधारणाची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी राज्याकडून विशेष निधी मंजूर करा, अशा मागण्या मंजूर करण्यात आल्या.

हेक्टरी १ लाखाची मदत करा
बाधित शेतक-यांना प्रतिहेक्टरी १ लाख रुपये आणि शेतमजूर कुटुंबाला २५ हजार रुपये थेट मदत द्या. फळबाग, केळी, ऊस आणि धान उत्पादक शेतक-यांना तातडीने आर्थिक मदत वितरित करा, वाळणा-या फळबागा वाचवण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे तातडीने आदेश काढा. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या प्रलंबित योजनांचे अनुदान त्वरित शेतक-यांच्या खात्यात वर्ग करा.दुष्काळ निवारणाचा संपूर्ण निधी थेट विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिका-यांकडे सुपूर्द करा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

दुष्काळग्रस्तांना शक्य ती मदत देणार
एल निनोचे संकट गंभीर आहे. भविष्यात तो आणखी वाढणार आहे. त्यामुळे आपल्याला सर्व प्रकारची तयारी ठेवायची आहे. अडचणीच्या काळात कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, हे आम्ही ठरवलेले आहे. ज्या काही अडचणी येतील, त्या आम्ही दूर करणार आहोत. केवळ पैसा नाही, तर जी मदत शक्य असेल, ती सर्वांना केली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जुलै २०२७ पर्यंत पाणी आरक्षित ठेवू
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठा जुलै २०२७ पर्यंतची गरज याचा अंदाज घेऊन आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही मोठ्या धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. अशा धरणांतील पाणी जुलै २०२७ पर्यंत पिण्यासाठी आरक्षित ठेवून उर्वरित पाणी उद्योग, रबी पिकांसाठी देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news