28.6 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeमहाराष्ट्रपक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवार साहेबांना गोल्ड मेडल मिळेल

पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवार साहेबांना गोल्ड मेडल मिळेल

मुंबई (प्रतिनिधी) : मी पुन्हा आलो आणि दोन पक्ष फोडून आलो, हे मी गमतीने बोललो होतो. अजित पवार व एकनाथ शिंदे आपल्याला पक्षात भवितव्य नाही हे स्पष्ट झाल्यानंतर राजकीय महत्त्वाकांक्षेने बाहेर पडले. मी त्यांचे पक्ष फोडले नाहीत आणि पक्ष फोडण्याचाच विषय असेल तर आजपर्यंत सर्वात जास्त पक्ष फोडण्याचं रेकॉर्ड पवार साहेबांच्या नावावर आहे. देशामध्ये जर पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर गोल्ड मेडल पवार साहेबांना मिळेल, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला. मुंबई तक या वृत्तवाहिनीवरील बैठक या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी बोलताना फडणवीस यांनी आपण कोणताही पक्ष फोडला नाही तर त्यांच्या अंतर्गत मतभेदांमुळे फुटल्याचा दावा केला. विधानसभा निवडणुकीआधी एका मुलाखतीत ‘पुन्हा येईन’ म्हणालो होतो त्या वरून आपल्याला बरेच ट्रोल केले गेले. अडीच वर्षांत राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ‘मी सत्तेत पुन्हा आलो.. आणि येताना दोन पक्ष फोडून आलो..’, असं गमतीने म्हणालो होतो. काही लोकांनी तेवढेच वाक्य उचलले. असं कोणी कोणाचा पक्ष फोडू शकत नाही. त्या-त्या पक्षातील महत्त्वाकांक्षांमुळे ते पक्ष फुटले आहेत. त्या ठिकाणी उद्धवजींकडे आणि पवार साहेबांकडे ज्या वेळेस शिंदे साहेबांना वाटलं आणि तिकडे अजित पवारांना वाटलं की, पक्षात आमचं कोणतंही भविष्य नाही. कारण इकडे आदित्य ठाकरेंना भविष्य आहे, दुसरीकडे सुप्रिया सुळेंना भविष्य आहे त्यामुळे त्यांनी निर्णय घेतले. आजपर्यंत पक्ष फोडण्याचा रेकॉर्ड हा पवार साहेबांच्या नावावर आहे, असा टोला त्यांनी लगावला.

शरद पवारांना सहानुभूतीचा फायदा मिळाला; पण त्यांनी खूप जागा जिंकल्या अशी परिस्थिती नाही. त्यांची बीडची जागा केवळ ६ हजार मतांनी निवडून आली. तिथे कुठे सहानुभूती आहे, ध्रुवीकरणावरच ते निवडून आले. एक गोष्ट निश्चित आहे की, पवार साहेबांनी अतिशय अनुभवाने जागा निवडल्या. याचं त्यांना श्रेय द्यावं लागेल. अँटी इन्कम्बन्सी कुठे आहे, याचा विचार करून त्यांनी जागा निवडल्या. कमी जागा घ्यायच्या; पण निवडून येणा-या घ्यायच्या हेच त्यांचे धोरण आहे मात्र हे सगळं असलं तरी तरी त्यांना ४३.९ आणि ४३.३ टक्के मतं आम्हाला मिळाली. फक्त ०.३ टक्क्यांचा फरक का? सहानुभूती असती तर हा फरक ४-५ टक्के हवा होता, असंही फडणवीस म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR