युगांडावरून नागपुरात आलेली व्यक्ती २१ दिवस ‘होम आयसोलेशन’मध्ये

नागपूर : प्रतिनिधी
आफ्रिकी देशांमध्ये धुमाकूळ घालणा-या इबोलाच्या नव्या घातक विषाणूच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारच्या आदेशानंतर नागपूर विमानतळ हायअलर्टवर आले आहे. मंगळवारी युगांडावरून नागपुरात परतलेल्या एका ४७ वर्षीय प्रवाशाला खबरदारीचा उपाय म्हणून थेट २१ दिवसांसाठी ‘होम आयसोलेशन’मध्ये (विलगीकरणात) ठेवण्यात आले आहे. संबंधित प्रवाशामध्ये सध्या कोणतीही लक्षणे नसली, तरी नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य पथक पुढील २१ दिवस त्यांच्या प्रकृतीवर २४ तास बारीक लक्ष ठेवून असणार आहे.

आफ्रिकी देशांमध्ये ‘इबोला’ विषाणूच्या नव्या व अत्यंत घातक अशा ‘बुन्डिबुग्यो’ स्ट्रेनचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या संघटनेने (डब्ल्यूएचओ) आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य स्तरावर ‘सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’घोषित केली आहे. या गंभीर जागतिक परिस्थितीची दखल घेत केंद्र सरकारने भारतीयांना इबोलाचा प्रादुर्भाव असलेल्या देशांमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, नागपूर विमानतळावर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
लक्षणे नाहीत, संपर्कातही नाही

मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगितले, युगांडा देशातून प्रवास करून मंगळवारी नागपुरातील विमानतळावर दाखल झालेल्या पुरुषाला कोणतेही लक्षणे नाहीत. प्रवाशाला विचारपूस केल्यावर त्याने इबोला रुग्णाच्या संपर्कात आले नसल्याचेही सांगितले आहे. मार्गदर्शक तत्त्वानुसार त्यांना पुढील सलग २१ दिवस घरीच विलगीकरणाचा सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान रोज ओराग्य विभाग त्यांच्या प्रकृतीची चौकशी करणार आहे. लक्षणे दिसताच मेडिकलमध्ये दाखल केले जाईल.

‘बुन्डिबुग्यो स्ट्रेन’ घातक
इबोला हा एक व्हायरल हॅम्रेजिंग फीव्हर म्हणजेच शरीराच्या आतून आणि बाहेरून रक्तस्त्राव घडवून आणणारा अत्यंत गंभीर आजार आहे. या आजारात मृत्यूचे प्रमाण अत्यंत उच्च असते. चिंतेची बाब अशी की, सध्या ‘बुन्डिबुग्यो’ या विशिष्ट स्ट्रेनवर जगात कोणतीही अधिकृत लस किंवा विशिष्ट औषधोपचार उपलब्ध नाही.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूर कृषी महाविद्यालयात दुर्मिळ वनौषधी बीज बँकेचे उद्घाटन; ५०० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन!
03:01
Video thumbnail
Latur|लातूरचे कृषी महाविद्यालय बनले ऑक्सिजन हब;महाविद्यालय परिसरात तब्बल २ लाख वृक्षांचे संवर्धन
03:25
Video thumbnail
Latur|आर्ट ऑफ लिव्हिंगचा साडेतीन लाख वृक्षलागवडीचा संकल्प; विद्यार्थ्यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ!
01:41
Video thumbnail
Latur|घरात घुसलेल्या पाण्याने संसार उद्ध्वस्त;महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाचा आरोप
01:28
Video thumbnail
Latur|लातुरात १० हजार झाडांचा १० वा वाढदिवस; जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा!
04:33
Video thumbnail
Nanded|उमेदवारी बदलल्यानंतर सुमठाणकरांची सोशल मीडियावर नाराजी?
01:00
Video thumbnail
'विप्रो'च्या माजी महिला अधिकाऱ्याचा इस्लाम स्वीकारण्यासाठी छळ केल्याचा आरोप
01:30
Video thumbnail
नोएडामध्ये थरार! हायराईज सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर भीषण आग; अनेक फ्लॅट्सना आगीचा विळखा
00:55
Video thumbnail
'पेड्डी' चित्रपटाच्या यशासाठी जान्हवी कपूर तिरुपतीच्या चरणी; ३,५५० पायऱ्या चढून पूर्ण केली नवसपूर्ती
00:58
Video thumbnail
Nanded|काँग्रेसचा उमेदवार असता तर माघार घेतली असती; उबाठाला जागा सुटल्याने निवडणूक लढणार– इंगोले
01:20
Video thumbnail
जळकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; वातावरणात पसरला गारवा
00:49
Video thumbnail
Latur|आमदार पुत्र ऋषिकेश कराड यांच्यावर जमीन खोदल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार!
05:03
Video thumbnail
Nanded|प्रवीण पाटील चिखलीकर यांची विधान परिषद निवडणुकीतून माघार
08:45
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषद निवडणुकीतून माधवराव पाटील जवळगावकर यांची माघार
02:21
Video thumbnail
Nanded|अर्धापुरात दमदार पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
01:16

Latest news