पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस सज्ज!

पिंपरी : प्रतिनिधी
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सहा ते सात लाखांहून अधिक वारकरी आणि भाविक शहरातील पालखी मार्गावरून प्रवास करणार आहेत. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था, वाहतूक, गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी दोन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात असणार आहेत. याशिवाय एसआरपीएफ, होमगार्ड, बॉम्बशोधक पथक आणि वाहतूक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

संत तुकाराम महाराज पालखी ७ जुलै रोजी देहूतून प्रस्थान करून ८ जुलै रोजी आकुर्डी येथे मुक्काम करणार आहे. त्यानंतर ९ जुलै रोजी पिंपरी, कासारवाडी आणि दापोडीमार्गे पुणे शहरात प्रवेश करणार आहे. तसेच, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ८ जुलै रोजी आळंदीतून प्रस्थान करून गांधीवाडा येथे मुक्काम करणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ९ जुलै रोजी भोसरी, दिघीमार्गे पुणे शहराच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या दोन्ही पालखी सोहळ्यादरम्यान मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहणार असल्याने पोलिस प्रशासनाने सर्वंकष नियोजन केले आहे.

पोलिसांनी पालखी मार्गावरील गर्दीची ठिकाणे निश्चित करून तेथे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचे नियोजन केले आहे. देहू मंदिर परिसर, इनामदार वाडा, अनगडशहा बाबा, भक्ती-शक्ती चौक, आकुर्डी, पिंपरी, कासारवाडी, हॅरिस ब्रिज दापोडी, आळंदी, गांधीवाडा, भोसरी फाटा, दिघी आणि इतर ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज असल्याने या ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था राहणार आहे.

यंदाच्या बंदोबस्तासाठी पोलिस आयुक्तालयातील सर्व यंत्रणा कार्यरत राहणार आहेत. वरिष्ठ अधिका-यांपासून ते पोलिस शिपायांपर्यंत सर्व मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. एसआरपीएफच्या तीन कंपन्या, होमगार्ड, बॉम्बशोधक व नाशक पथक (बीडीडीएस), वाहतूक शाखा, रॅपिड कंट्रोल पथक तसेच विविध प्रकारची वाहने बंदोबस्तात सहभागी असणार आहेत. एकूण आठ वरिष्ठ अधिकारी, १९ सहाय्यक पोलिस आयुक्त व पोलिस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी, ५२ पोलिस निरीक्षक, २३० उपनिरीक्षक व सहाय्यक अधिकारी, १ हजार ९९९ पोलिस कर्मचारी, ४३५ वाहतूक कर्मचारी, ८०० होमगार्ड, १२ ट्रक, २० जीप आणि इतर वाहने बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहेत.

पालखी मार्ग सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेवरही विशेष भर देण्यात आला आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी ३२ रस्ते तात्पुरते बंद ठेवण्यात येणार असून, ४३ ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. याशिवाय १८ महत्त्वाच्या चौकांवर वाहतूक पोलिसांचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी १३ रस्ते बंद राहणार असून, सात ठिकाणी वाहतुकीचे पर्यायी मार्ग लागू करण्यात येणार आहेत.

या ठिकाणी सर्वाधिक गर्दीचा अंदाज
पालखी सोहळ्यादरम्यान देहू मंदिर परिसर, इनामदार वाडा, अनगडशहा बाबा, भक्ती-शक्ती चौक, आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर, पिंपरी एच. ए. कॉलनी, कासारवाडी, हॅरिस ब्रिज (दापोडी), आळंदी मंदिर परिसर, गांधीवाडा, भोसरी फाटा आणि दिघी गाव या ठिकाणी सर्वाधिक गर्दी होण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. काही ठिकाणी तीन ते सहा लाखांपर्यंत भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने या सर्व ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, गर्दी व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news