22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeमहाराष्ट्रशाहरुखचे एन्काऊंटर करणा-या पोलिसांना १ लाख रुपयांचे बक्षीस

शाहरुखचे एन्काऊंटर करणा-या पोलिसांना १ लाख रुपयांचे बक्षीस

पुणे : पुण्यातील कुख्यात सराईत गुंड शाहरुख उर्फ अट्टि रहीम शेख याचा सोलापूरमधील लांबोटी गावात मध्यरात्री झालेल्या पोलिस चकमकीत मृत्यू झाला. पुणे येथील कुख्यात टिपू पठाण टोळीचा सदस्य असलेल्या शाहरुखवर खून, दरोडा, गोळीबार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. मकोका अंतर्गत कारवाईनंतर तो फरार झाला होता आणि पोलिसांना गुंगारा देत सोलापूरमध्ये नातेवाईकांकडे लपून बसला होता.

अशात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख लांबोटी गावात एका नातेवाईकाच्या घरी लपल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांचे पथक मध्यरात्री त्या ठिकाणी पोहोचले. मात्र, पोलिसांना पाहताच शाहरुखने शरण न जाता थेट पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला.

या चकमकीत शाहरुखला चार गोळ्या लागल्या आणि त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या धाडसी कारवाईबद्दल पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाचे कौतुक करत १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. शाहरुख शेखच्या मृत्यूनंतर पुणे शहरातील गुन्हेगारीवर काही प्रमाणात नियंत्रण येईल अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR