Homeराष्ट्रीयराष्ट्रपती मुर्मू यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट

राष्ट्रपती मुर्मू यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट

अध्यात्म आणि समाजसेवेवर सखोल चर्चा

मथुरा : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूउत्तर प्रदेश दौ-यावर असून त्यांनी आज वृंदावनमध्ये प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राष्ट्रपती मुर्मू आणि प्रेमानंद महाराज यांच्यात अध्यात्म, समाजसेवा आणि जनकल्याण अशा विविध विषयांवर सखोल चर्चा झाली.

या आठवड्यात प्रेमानंद महाराजांचा वाढदिवस असल्याने ही भेट विशेष ठरली. राष्ट्रपतींनी आश्रमात महाराजांचे प्रवचन ऐकले आणि त्यांना नम्रतापूर्वक वंदन केले. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. मथुरा दौ-यात राष्ट्रपतींनी विविध मंदिरांमध्ये पूजा-अर्चना केली, तसेच अनेक आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. शुक्रवारी सकाळी त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात धार्मिक कार्यक्रमांनी केली.

अयोध्या येथे राम मंदिरात दर्शन
यापूर्वी गुरुवारी राष्ट्रपती मुर्मू यांनी अयोध्येला भेट देत श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. या भेटीदरम्यान त्यांनी विशेष धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला आणि रामलल्लांचे आशीर्वाद घेतले. राष्ट्रपतींनी देशातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थनाही केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR