कीटकांप्रमाणे रांगत आंदोलक पोहोचले मंत्र्यांच्या निवासस्थानी

लखनौ : तब्बल ६९००० शिक्षक भरती उमेदवारांनी शिक्षण मंत्री संदीप सिंह यांच्या निवासस्थानी निदर्शने केली. निदर्शक मंत्र्यांच्या निवासस्थानापासून सुमारे १०० मीटर आधी जमा झाले. जमिनीवर किड्या-मुंग्यांसारखे रांगत ते मंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचले.

यावेळी आंदोलक म्हणाले आम्ही सरकारच्या दृष्टीने किडे-मुंग्या झालो आहोत. आमचे कुठेही कोणी ऐकत नाही. त्यामुळे आज आम्ही किड्यांसारखे रांगत मंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचलो. भीषण उष्णतेमुळे अनेक उमेदवार बेशुद्ध पडले. पोलिसांनी त्यांना पाणी पाजले. यावेळी निदर्शकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आम्ही घरातून हरलो आहोत आणि आता सरकारकडूनही कोणतीही अपेक्षा राहिलेली नाही. ही आमची शेवटची विनंती आहे. जर सुनावणी झाली नाही, तर आम्ही सर्व उमेदवार सामूहिकरित्या आत्मदहन करू. थोडीशी शेती आहे, त्याच शेतीतून घराचा खर्च चालतो. बनारस येथून आलेल्या कैलाश नाथ मौर्या यांनी सांगितले आम्हाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना फक्त एवढेच सांगायचे आहे की, आम्ही आता आमचा धीर गमावला आहे. आमच्यात आता अजिबात सहनशक्ती उरलेली नाही. कैलाश नाथ मौर्या म्हणाले आम्ही आमच्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत नाही आहोत. सिस्टीममुळे आम्ही बेरोजगार फिरत आहोत. उच्च न्यायालयात जिंकल्यानंतरही आम्हाला नोकरी मिळाली नाही. आमचे म्हणणे ऐकायला कोणी तयार नाही.

प्रत्येकजण आमच्याबद्दल उलटसुलट बोलतो. ओम प्रकाश राजभर आमचे मंत्री आहेत, ज्यांनी कधीही न्यायाची गोष्ट केली नाही. राजभर म्हणतात की हे ६९००० शिक्षक भरतीवाले चप्पल खाण्याच्या लायकीचे आहेत, हे किती लाजिरवाणे विधान आहे. जर नोकरी मिळाली नाही, तर आम्ही लोक वर्गणी गोळा करून ओमप्रकाश राजभर यांच्या विरोधात प्रचार करू आणि त्यांना निवडणूक हरवू.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात परभणीत महामोर्चा #marathilivenews #breakingnews
00:34
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये FDA-एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; लाखोंचा गुटखा जप्त!
01:13
Video thumbnail
विधान परिषद निवडणुकीपूर्वी आष्टीकरांची सोशल मीडियावरून भूमिका स्पष्ट #marathilivenews #breakingnews
02:12
Video thumbnail
Latur|जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
02:18
Video thumbnail
Latur|RTO कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू
05:29
Video thumbnail
Nanded|नांदेड विधान परिषदेत मोठा सस्पेन्स; आष्टीकर ठरवणार गेम?
01:39
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये 'मृत्यूचा डीव्हायडर'; अपघाताची वाट पाहतेय प्रशासन?
02:18
Video thumbnail
Latur|तुकाराम मुंडेंचा धडाका; लातूरच्या खव्याच्या दुकानांवर FDA ची धाड
02:37
Video thumbnail
parbhani Protest|मसला येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन; मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
02:30
Video thumbnail
माढा तालुक्यातील दारफळ येथील नवभारत विद्यालयात 'प्रवेशोत्सव' व पाठ्यपुस्तक वितरण सोहळा संपन्न!
02:52
Video thumbnail
Big Breaking|ऑपरेशन टायगरच्या चर्चेत नवा ट्विस्ट! दोन खासदार दिल्लीला रवाना
01:21
Video thumbnail
Nanded|चोरंबा ग्रामपंचायतीच्या कारभारा विरोधात तरुणाच अन्नत्याग उपोषण
02:57
Video thumbnail
Nanded|संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आंदोलन
02:30
Video thumbnail
Latur|घरेलू कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन
04:04
Video thumbnail
Latur|जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाचा पुन्हा एल्गार...
05:24

Latest news