जनजागृतीने तीन टक्के मतदान वाढले

सोलापूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काही तासातच राजकीय संबंधित तसेच इतर हजारो पोस्टर्स हटविले. आचारसंहिता भंगची तक्रार दाखल होताच अवघ्या काही मिनिटात अधिकाऱ्यांनी स्पॉटवर पोहोचून कारवाई केली.

अकरा विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रोज १२ ते १४ तास काम अन् मतदान जनजागृती केल्यानं यंदा ३ टक्क्यांनी मतदान वाढले. याची दखल निवडणूक आयोगाने घेतली असून, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह निवडणूक अधिकाऱ्यांचे निवडणूक आयोगाने कौतुक केले आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी १८ हजार कर्मचाऱ्यांनी योगदान दिले आहे.

२०१९ साली ६४.५९ टक्के मतदान झाले. यंदा ६७.७२ टक्के मतदान झाले आहे. एकूण मतदानात यंदा ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. विधानसभेला एकूण ११ विधानसभा मतदारसंघात ३७३८ मतदान केंद्रे होती. या सर्व मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार किमान पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती केलेली होती. मतदाराला मतदान केंद्रावर येऊन सहज मतदान करता येईल, या पद्धतीने मतदान केंद्राची निवड करण्यात आलेली होती.

काही मिनिटांत मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचण्यास मदत झाली. एकूण मतदान केंद्राच्या जवळपास ६० टक्के म्हणजेच २३०५ मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. सी-व्हिजिल कक्षात निवडणुकीच्या अनुषंगाने आलेल्या तक्रारीवर कक्षाच्या वतीने वेळेत तक्रारी संबंधितांपर्यंत पोहोचवून त्याचा निपटारा करण्यात आला.

मतदारांच्या आरोग्याचीही काळजी मतमोजणी परिसरात एखादी आरोग्याची समस्या उ‌द्भवली तर त्यावेळेस त्यांच्यावर ताबडतोब प्राथमिक उपचार करण्याकरता प्राथमिक उपचार किट तसेच अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था मतमोजणी परिसरात करण्यात आली होती. परिसरात चहा, अल्पोपहार आणि भोजन व्यवस्था ठेवण्यात आली होती. त्यामुळे कुठलाही प्रकारचा तणाव हा कर्मचारी, अधिकारी आणि निवडणूक उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींवर आला नाही.

ज्या अधिकाऱ्यांना जी जबाबदारी दिली, ती त्यांनी अचूकपणे पार पडली. नियंत्रण कक्षातून आम्ही मतदान केंद्रांवर लक्ष ठेवून होतो. मतदान केंद्रावर अचानक संपर्क तुटला किंवा तत्काळ संपर्क होत नसल्यास आम्ही समांतर ग्राम संपर्क यंत्रणा उभारली होती. सुदैवाने असे कुठेच घडले नाही. सर्व मतदान केंद्र संपर्कात होते. ३ टक्के मतदान वाढल्याने निवडणूक आयोगाकडून सोलापुरातील सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक झाले. असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगीतले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेड बसस्थानक परिसरात एसटी बसची धडक; महिलेचा जागीच मृत्यू
00:34
Video thumbnail
Nanded|महापुराला वर्ष झालं, आश्वासनांचं काय? हसनाळचे गावकरी थेट नदीत उतरले!
01:04
Video thumbnail
Latur|श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते रुपाली फॅशन स्टुडिओचे दिमाखात उद्घाटन
04:06
Video thumbnail
LIVE-लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
29:29
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! बी. व्ही. काळे रुग्णालयात तपासणी-उपचार मोफत
02:42
Video thumbnail
Latur|लातूरकरांसाठी मोठी आरोग्यसुविधा! शिवपुजे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तपासणी मोफत
01:05
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आदरांजली;पोदार हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थीरोग शिबिर
02:13
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त बरमदे हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या मोफत
02:07
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासराव देशमुखांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली
02:35
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुखांच्या स्मृतिदिनी बाभळगावात जनसागर!
01:01
Video thumbnail
Latur|हरंगुळ पेटलं! प्रदूषण आणि अवैध धंद्यांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
03:59
Video thumbnail
Latur|लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने अनोखी आदरांजली;लातुरात महाआरोग्य शिबिर
03:52
Video thumbnail
Latur|धक्कादायक! ट्रक-ऑटोच्या धडकेत एकाचा मृत्यू
01:03
Video thumbnail
Latur|माजी सरपंच धनंजय देशमुख यांची मोठी भूमिका; म्हणाले—“परवाना रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार
06:26
Video thumbnail
जळकोटच्या आठवडी बाजारात भाजीपाला स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी
02:02

Latest news