28 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeमहाराष्ट्रसर्वाधिक वाहतूक कोडींत पुणे जगात ५ व्या स्थानी

सर्वाधिक वाहतूक कोडींत पुणे जगात ५ व्या स्थानी

मुंबई १८ व्या स्थानी टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्सचा २०२५ चा अहवाल

मुंबई / पुणे : जगभरातील शहरांमधील वाहतूक स्थितीचा आढावा घेणा-या प्रसिद्ध टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्सचा २०२५ चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात बंगळरू जगात दुस-या, तर पुणे शहर जगात पाचव्या क्रमांकावर आले आहे. मुंबई शहरही या यादीत असून ते १८ व्या क्रमांकावर आहे.

टॉम टॉम टॉम टॉम संस्थेच्या अहवालानुसार, जगातील ४९२ शहरांतील वाहतूक कोंडीचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये पहिला क्रमांक मेक्सिको सिटी, दुसरा बंगळूर, तिसरा डब्लिन, चौथा लॉर्डस्­ आणि पाचवा क्रमांक पुण्याचा लागत आहे. २०२४ च्या अहवालात पुण्याचा चौथा क्रमांक लागत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता हा क्रमांक पाचवर गेला आहे.
मुंंबईचा १८ वा आणि देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीचा २३ वा क्रमांक लागला आहे. या अहवालामुळे वाहतूक कोंडीसंदर्भात पुणे प्रशासनाला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.

आगामी काळात प्रशासन याकरिता काय प्रयत्न करणार, हे आता पाहावे लागेल. मुंबईतही वाहतूक कोंडी ही समस्या या यादीत असल्याने प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागणार आहेत. संस्थेच्या अहवालानुसार, जगातील ४९२ शहरांतील वाहतूक कोंडीचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये पहिला क्रमांक मेक्सिको सिटी, दुसरा बंगळूर, तिसरा डब्लिन, चौथा लॉर्डस्­ आणि पाचवा क्रमांक पुण्याचा लागत आहे. २०२४ च्या अहवालात पुण्याचा चौथा क्रमांक लागत असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता हा क्रमांक पाचवर गेला आहे.

मुंंबईचा १८ वा आणि देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीचा २३ वा क्रमांक लागला आहे. या अहवालामुळे वाहतूक कोंडीसंदर्भात पुणे प्रशासनाला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. आगामी काळात प्रशासन याकरिता काय प्रयत्न करणार, हे आता पाहावे लागेल. मुंबईतही वाहतूक कोंडी ही समस्या या यादीत असल्याने प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

वाहतूक कोंडीत ही शहरे आघाडीवर
देशातील वाहतूक कोंडीत प्रथम बंगळूरू, दुसरे पुणे, तिसरे मुंबई, चौथे नवी दिल्ली, पाचवे कोलकाता, सहावे जयपूर, सातवे चेन्नई, आठवे हैदराबाद, नववे एर्नाकुलम, दहावा क्रमांक अहमदाबादचा लागत असल्याचे ‘टॉम टॉम’ अहवालातून समोर आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR