लखनौ : काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय लष्करासंदर्भात केलेल्या कथित अपमानास्पद टिप्पणी प्रकरणात, लखनौच्या एमपी-एमएलए न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान केलेल्या एका विधानासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणात, राहुल गांधी पहिल्या पाच सुनावण्यांदरम्यान न्यायालयात हजर नव्हते. मात्र, मंगळवारी अॅडिशनल चीफ ज्यूडिशियल मॅजिस्ट्रेट आलोक वर्मा यांच्या समोर स्वत: हजर होत त्यांनी सरेंडर केले आणि जामीन अर्ज दाखल केला.
राहुल गांधी पाच सुनावण्यांना अनुपस्थित होते. यानंतर, ते आज अॅडिशनल चीफ ज्यूडिशल मजिस्ट्रेट आलोक वर्मा यांच्यासमोर स्वत: हजर झाले. खरे तर, मे महिन्यात आलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर, ते आज हजर झाले आहेत. राहुल गांधी यांनी संबंधित याचितेत, मानहानी प्रकरण आणि लखनौ एमपी-एमएलए न्यायालयाने फेब्रुवारी २०२५ मध्ये जारी केलेल्या समन आदेशाला आव्हान दिले होते.
















