राहुल गांधींनी लाँच केला ‘सत्याग्रह’ मंच; देशभरातील सर्व आंदोलने एकाच नकाशावर!

नवी दिल्ली : राहुल गांधींनी ‘सत्याग्रह’ वेबसाईट लॉन्च केली आहे. त्यांनी सांगितले की, याचा उद्देश संघर्ष करणा-या आणि विरोध करणा-या लोकांना आवाज देणे हा आहे. त्यांनी लोकांना आपली गोष्ट शेअर करण्याचे आवाहन केले आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी ‘सत्याग्रह’ नावाच्या एका नव्या मंचची सुरुवात केली. या मंचचा उद्देश देशभरात आपल्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी संघर्ष करणा-या लोकांचा आवाज एका सामायिक मंचावर आणणे हा आहे. राहुल गांधींनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त याची सुरुवात केली आणि यासंदर्भातील वेबसाईटची लिंकही शेअर केली.

त्यांनी एक व्हीडीओ जारी करून म्हटले, जेन झी, विद्यार्थी, शेतकरी, आदिवासी, दलित, महिला, प्रत्येक संघर्षाची स्वत:ची एक गोष्ट आहे. मात्र जो आवाज एकटा उठतो, तो अनेकदा दाबला जातो. त्यांनी म्हटले, ‘‘देशभरात लोक अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून तुमची लढाई ही माझी लढाई आहे. आता नव्या सत्याग्रहाची वेळ आहे. तुम्ही कोणत्या मुद्यांसाठी संघर्ष करत आहात, ते मला सांगा. मी तुमचे म्हणणे ऐकत आहे.’’

काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, ‘सत्याग्रह’ हा या सर्व आवाजांना एका मंचावर एकत्र आणण्याचा उपक्रम आहे. राहुल गांधींनी लोकांना आवाहन केले की, जर ते कोणत्याही अन्यायाविरोधात लढत असतील, तर त्यांनी आपली गोष्ट या मंचावर शेअर करावी. त्यांनी म्हटले, ‘तुमच्यासारखे आणखी कोण-कोण लढत आहेत, हे तुम्ही पाहाल. आणि मी जे काही करू शकतो, ते करेन – संसदेत, रस्त्यावर, पत्र लिहून, जिथे जिथे माझी गरज असेल तिथे तुमच्यासोबत उभे राहून – विरोधी पक्षनेता म्हणून ही माझी जबाबदारी आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या मंचाच्या माध्यमातून लोक आपली ओळख, आपले मुद्दे आणि त्यांच्या हक्कांच्या मार्गात उभ्या असलेल्या आव्हानांची माहिती शेअर करू शकतात.

प्रत्येक संघर्षाची स्वत:ची एक कहाणी
एकट्याने उठणारा आवाज अनेकदा दाबला जातो. ‘सत्याग्रह’ हा या सर्व आवाजांना एका नकाशावर एकत्र आणण्याचा एक उपक्रम आहे. महात्मा गांधींच्या विचारांचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, बापूंनी सत्याग्रहाचा मार्ग दाखवला. ते म्हणाले की सत्य हे सर्वांत मोठे शस्त्र आहे, परंतु सत्यासोबत एकजूट होऊन उभे राहणे ही त्याहूनही मोठी शक्ती आहे. त्यांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष करणा-या लोकांना आपल्या कथा सांगण्याचे आवाहन केले.

विरोधाला आवाज देणे हा उद्देश
राहुल गांधींनी म्हटले, संपूर्ण देशात सत्य दाबले जात आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक विरोध प्रदर्शने होत आहेत. कुठे जमिनीसाठी, कुठे महिलांच्या हक्कांसाठी, कुठे दलित आणि ओबीसींच्या हक्कांसाठी, तर कुठे शिक्षण आणि परीक्षांबाबत. आम्हाला या सर्व आंदोलनांना संघटित करायचे आहे, त्यांना एका मंचावर एकत्र आणायचे आहे आणि तुमच्यासोबत मिळून तुम्ही ज्या लढ्यासाठी उभे आहात, तो सोडवण्यासाठी आम्ही तुमची कशी मदत करू शकतो, हे पाहण्यात मदत करायची आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ! साड्यांसाठी महिलांची झटापट
01:01
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31

Latest news