नांदेड: ग्रामीण पोलीस पथकातील पोलिस निरीक्षक ओमकार चिंचोलकर पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, वसंत केंद्रे, विनोद पवार,मारुती पचलिंग, शंकर माळगे, समीर अहमद, सचिन चावरे, धम्मपाल कांबळे यांच्या पथकाने ५ मे रोजी शहरातील निमरा हिल्स कॉलनी येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकली.
यावेळी जुगारी शेख शौकत शेख बाखर, शेख बरकत शेख बशीर, मोहम्मद सुभान मोहम्मद खाजा, शेख अनवर शेख छोटे मिया, शेख जाहिद शेख नजीर यांच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी पथकाने १ दुचाकी,५ मोबाईल, रोख ५ हजार ३०० रुपये व जुगाराची साहित्य असा एकूण १ लाख ४२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
















