Homeनांदेडपिंपळगाव शिवारातील जुगार अड्डयावर धाड

पिंपळगाव शिवारातील जुगार अड्डयावर धाड

२.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, १२ जुगा-यांवर कारवाई

नांदेड : प्रतिनिधी
ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत कुंडलवाडी हद्दीत मौजे पिपळगांव
(कु) शिवारात चालणा-या जुगार अड्डयावर पोलिसांनी दि. १२ रोजी धाड टाकली. यात १२ जुगा-यांवर कारवाई करून २ लाख ३४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील ४ जुगा-यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कुंडलवाडी हद्दीत मौजे पिपळगांव (कु) शिवारात दगडे यांच्या शेताचे जवळ कांही इसम अवैधरित्या तिरंट नावाचा जुगार अड्डा चालविण्यात येत आहे. पोलिस पथकाने सदर ठिकाणी दि. १२ एप्रिल रोजी धाड टाकली. या कारवाई तिरंट नावाचा जुगार खेळत असतांना १२ जुगा-यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडुन नगदी रक्कम २४ हजार रुपये, बदक छाप पत्ते, ४ मोटारसायकल व जुगाराचे साहीत्य असा मिळून असा २ लाख ३४ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR