ऑपरेशन ट्रायडंट अंतर्गत देशात ३८ ठिकाणी छापे

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये अमली पदार्थांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. या कारवाईदरम्यान तपास यंत्रणांनी एकाच वेळी ३८ ठिकाणी छापे टाकले. या माध्यमातून अमली पदार्थांच्या मोठ्या तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी एका आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी करणा-या टोळीचा पर्दाफाश करण्यात आल्याची माहिती दिली. सुरक्षा दलांनी आसाम, मिझोराम आणि मणिपूर या राज्यांमधून १८ जणांना अटक केली आहे. या कारवाईत सहभागी असलेल्या पथकाचे त्यांनी अभिनंदन केले. या पथकामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी आणि तिन्ही राज्यांतील पोलीस कर्मचा-यांचा समावेश होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर अमित शाह यांनी ऑपरेशन ट्रायडंट या मोहिमेबाबत माहिती दिली.

हे तस्करीचे नेटवर्क डेथ ट्रँगल कॉरिडॉरच्या माध्यमातून भारत, म्यानमार आणि बांगलादेशच्या सीमांपलीकडे अमली पदार्थांची तस्करी करत होते, असे त्यांनी सांगितले. पोलिस दलांनी आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांनी नक्षलवाद्यांचा सामना करण्यासह अमली पदार्थांविरोधातील लढ्यात भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे असे शाह यांनी म्हटले होते. ते म्हणाले या अमर वीरांनी देशाच्या भूमीचा एक इंचही भाग परकीयांच्या हातात जाऊ नये, हा संकल्प कायम ठेवला. आपले कर्तव्य बजावताना त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले. तेव्हापासून दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. ते पुढे म्हणाले देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि सीमांच्या रक्षणासाठी या जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले नसते, तर आज आपण कुठे असतो, याची कल्पनाही कोणी करू शकत नाही.

एकाच वेळी ३८ ठिकाणी छापे
एक्स वरील आपल्या पोस्टमध्ये अमित शाह यांनी सांगितले की, ३१ डिसेंबर २०२९ पर्यंत भारताला अमली पदार्थमुक्त करण्याच्या केंद्र सरकारच्या संकल्पाचे हे अभियान प्रतीक आहे. अमली पदार्थांची तस्करी करणा-या टोळ्यांचे पूर्णपणे उच्चाटन होईपर्यंत देशाची कारवाई सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले आमच्या तपास यंत्रणांनी २३ ऑक्टोबर रोजी आसाम, मिझोराम आणि मणिपूरमध्ये एकाच वेळी ३८ ठिकाणी छापे टाकले आणि अमली पदार्थांची तस्करी करणा-या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत १०० कोटी रुपयांच्या हवाला व्यवहारांचा शोध लागला. तसेच १,४२४ बँक खाती गोठवण्यात आली, १७.८२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली, ५०० डेटोनेटर आणि १२ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणात एकूण १८ जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती अमित शाह यांनी दिली.

अमली पदार्थांविरोधात भारताचा लढा
अमित शाह यांनी यापूर्वी अमली पदार्थांच्या समस्येला भारतासमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हटले होते. हा धोका वेळीच रोखला नाही, तर देशाच्या प्रगतीला मोठा फटका बसू शकतो, असे त्यांनी सांगितले होते. केंद्र सरकारने डिसेंबर २०२९ पर्यंत देशाला अमली पदार्थमुक्त करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. २१ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलिस स्मारकावरून दिलेल्या संदेशात त्यांनी देशभरातील पोलिस दलांना भारताला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी आणि या धोक्याचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18

Latest news