अयोध्या : अयोध्येतील श्री राम मंदिर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एसटीएफ प्रमुखांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी धमकीचा ई-मेल पाठवला होता.
अयोध्येतील श्री राम मंदिर, सीएम योगी आणि एसटीएफ प्रमुख यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याची घटना एसटीएफने उघडकीस आणली आहे. एसटीएफच्या तपासात समोर आले आहे की, शेतकरी नेता देवेंद्र कुमार तिवारी, ज्यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांनी स्वत: सुरक्षा मिळवण्यासाठी आणि मोठा नेता बनण्यासाठी त्याच्या कर्मचा-यांना धमकीचा मेल पाठवण्यास सांगितले होते. याप्रकरणी दोन्ही कर्मचा-यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शेतकरी नेता, त्याचा ड्रायव्हर सुनीत आणि कटात सहभागी असलेला दुसरा युवक प्रभाकर यांचा शोध सुरू आहे.
आलमबागचे रहिवासी भारतीय किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र कुमार तिवारी यांनी यूपी-११२ ला सोशल मीडिया टॅग करून पोस्ट केली होती. २७ डिसेंबर रोजी झुबेर खान नावाच्या व्यक्तीने त्याच्या ई-मेलवर धमकीचा मेल पाठवल्याचा दावा केला होता. श्री राम मंदिर, सीएम योगी आणि एसटीएफ प्रमुख यांना बॉम्बस्फोट घडवून आणू अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल घेत यूपी-११२ च्या पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी सुशांत गोल्फ सिटी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता. एसटीएफचे डेप्युटी एसपी प्रमेश कुमार शुक्ला यांनी सांगितले की, गोंडाचे रहिवासी तहर सिंग आणि ओम प्रकाश मिश्रा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
देवेंद्र तिवारी यांना सुरक्षा हवी होती, असे तपासात समोर आले. त्यामुळे याप्रकरणाचा एक भाग म्हणून त्याने स्वत:ला धमकीचा ई-मेल पाठवला. श्री राम मंदिर, सीएम योगी आणि एसटीएफ प्रमुख जोडले गेले जेणेकरून हे प्रकरण मीडियामध्ये चर्चेत येतील. डेप्युटी एसपींनी सांगितले की, या प्रकरणातील देवेंद्र आणि इतर दोघांचा शोध सुरू आहे. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल. देवेंद्र हे एनजीओ गौ सेवा परिषद देखील चालवतात.