सोलापूर : राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन तर्फे पर्यावरण पूरक नागपंचमी साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम सिद्धेश्वर कन्या प्रशाला या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. नागपंचमी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी मातीपासून तयार केलेल्या नागाचे आणि वारुळाचे पूजन करण्यात आले. यानंतर संस्थेच्या अध्यक्षा सौ प्रांजली मोहीकर यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले. त्यांनी नागपंचमी साजरा करण्यामागील पारंपरिक प्रथा विद्यार्थ्यांना सांगितली.
तसेच साप किंवा नाग दिसल्यानंतर त्यांना न मारता आपला जीव वाचवत प्राण्यांचाही जीव कसा वाचवायचा यासाठी पर्यावरण पूरक संरक्षण कसे करता येईल यावरही मार्गदर्शन केले. राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना सापांच्या आणि नागांच्या संरक्षणासाठी तसेच वैयक्तिक संरक्षणासाठी घ्यावयाची दक्षता यावर आधारित सर्पमित्र पक्षी निरीक्षक राहुल उंब्रजकर यांच्यातर्फे पीपीटी द्वारे मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनात असलेले सापाबद्दलचे अनेक प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण राहुल उंब्रजकर आणि सुहास भोसले यांनी केले.
यानंतर विद्यार्थ्यांच्या नागपंचमीनिमित्त शाळेमध्ये बसवण्यात आलेले विविध पारंपारिक खेळ, मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आला.. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता गोटे तसेच सहशिक्षक शशिकांत माचनुरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या पर्यावरण पूरक नागपंचमीच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा प्रेमचंद मेने, विश्वस्त सौ ज्योती मेने, चि. वेदांत मोहीकर, संस्थेचे सदस्य श्री राम हुंडारी, गिता हुंडारी, निकम ताई, राजेश केकडे, मनोज देवकर, सुहास भोसले, राहुल उंब्रजकर आदी मान्यवर उपस्थित होते.