पाक सुधारला नाही तर कोणत्याही कारवाईसाठी तयार

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी पाकिस्तानबाबत म्हटले की, शेजारी देशाने दहशतवादाचे राज्य धोरण सुरूच ठेवले, तर भारत दहशतवादाविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.

ते म्हणाले की, भारत आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही. भारताला दुस-या देशाच्या भूमीवर कब्जा करायचा नाही आणि कोणालाही धमकावायचेही नाही. नवी दिल्ली येथे आयोजित एनडीटीव्ही डिफेन्स समिट २०२६ मध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. भारताच्या मोहिमा आणि इतर देशांसोबतचे सहकार्य नेहमीच राष्ट्रीय हित लक्षात घेऊन केले जाईल. भारताला मोहिमा हव्या आहेत, पण राष्ट्रीय हिताची किंमत मोजून नाही. भारताला सहकार्य हवे आहे, पण आपल्या धोरणात्मक स्वायत्ततेची किंमत मोजून नाही. थ्यूसीडाइड्स ट्रॅपची संकल्पना सांगते की, एखादा देश वेगाने उदयास येतो तेव्हा त्याचा आधीपासून शक्तिशाली असलेल्या देशांशी संघर्ष होऊ शकतो.

भारताकडे अशा द्विआधारी दृष्टिकोनातून पाहू नये. भारत ना यथास्थिती कायम ठेवणारी शक्ती आहे, ना विद्यमान व्यवस्था बदलणारी शक्ती; तो एक सभ्यतागत शक्ती आहे. पंतप्रधान मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत दहशतवादाची संपूर्ण यंत्रणा उद्ध्वस्त करण्याची गरज व्यक्त केली होती. त्यांनी दहशतवादाला होणारा निधीपुरवठा, भरती, कट्टरतावाद आणि सुरक्षित आश्रयस्थानांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.

यूएनमध्येही पाकवर निशाणा
संयुक्त राष्ट्र महासभेत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानवर निशाणा साधत भारताला दहशतवादापासून स्वत:चे रक्षण करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते की, दहशतवादासोबत मैत्री आणि सद्भावना एकाच वेळी टिकू शकत नाहीत.

पाणी रोखणे म्हणजे युद्धासारखे
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी २५ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांत भारताला युद्धाची धमकी दिली होती. भारताने सिंधू नदीचे पाणी रोखू नये, असे त्यांनी म्हटले होते. पाणी रोखण्याचा प्रयत्न पाकिस्तान युद्धाची कारवाई मानेल. शहबाज शरीफ यांनी वठ मध्ये काश्मीरचा मुद्दाही उपस्थित केला होता. शहबाज म्हणाले की, काश्मीर आमच्यासाठी मानेची नस आहे. काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यावर वठ मध्ये भारताच्या फर्स्ट सेक्रेटरी पेटल गेहलोत यांनी म्हटले होते की, पाकिस्तानने बेकायदेशीर कब्जात असलेल्या काश्मीरची परिस्थिती पाहायला हवी.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news