अमेरिकेवर मंदीचे सावट

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरातील देशांवर कर लादून त्यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा दावा करत आहेत, परंतु त्यांचे हे पाऊल उलटे पडताना दिसून येतंय. जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजने इशारा दिला आहे की अमेरिका सध्या मंदीच्या उंबरठ्यावर आहे. तसंच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर सध्या सुरू असलेला दबाव कोविडच्या महासाथीपेक्षाही जास्त आहे. जर लवकरच यावर उपाय शोधला गेला नाही तर त्याचा अमेरिकेतील नोक-यांवर सर्वाधिक परिणाम होईल असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यस्तरीय आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर, अमेरिका पुन्हा एकदा मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे असे मूडीजचे चीफ इकॉनॉमिस्ट मार्क झँडी म्हणाले. २००८ च्या महामंदीची भविष्यवाणी करणारे झँडी हे पहिले होते. सध्या या आकडेवारीचा कोविड-१९ महासाथीपेक्षाही वाईट परिणाम दिसून येत आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत राज्यांचा वाटा एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे आणि आकडेवारीवरून असे दिसून येत आहे त्यांचे उत्पादन एकतर कमी होऊ लागले आहे किंवा घसरण्याच्या मार्गावर आहे असे ते म्हणाले.

अनेक राज्ये मंदीने ग्रासलीत
झँडी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक माहिती शेअर केली. अर्थव्यवस्थेत ३३ टक्क्यांची भूमिका बजावणा-या राज्यांची अवस्था वाईट असून यापैकी अनेक राज्ये आधीच मंदीने ग्रासली आहेत, तर काही मंदीच्या उंबरठ्यावर आहेत. यावरून स्पष्ट होतं की अमेरिकन अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मंदीने ग्रासणार आहे असे त्यांनी नमूद केले. २००८ च्या सुरुवातीलाही मंदीची सुरुवात अमेरिकेतून झाली होती. तेव्हाही झँडी यांनीच मंदीचा अंदाज वर्तवला होता.

अमेरिकन नागरिकांवर दुहेरी आघात
यावेळी मंदी अमेरिकन नागरिकांवर दुहेरी संकट आणेल. पहिले म्हणजे, वाढत्या महागाईमुळे त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंच्या किमती वाढतील आणि दुसरे म्हणजे, नोक-यांवर संकट येईल. अर्थातच, कमी झालेले उत्पन्न आणि वाढत्या खर्चामुळे अमेरिकन नागरिकांवरील संकट आणखी गडद होईल. या दोन्ही संकटांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सध्या किमती वाढू लागल्या आहेत आणि त्याचा सामान्य माणसावरही परिणाम दिसू लागला आहे. भविष्यात त्याची तीव्रता किती गंभीर असेल यावर आपल्याला लक्ष ठेवावे लागणार असल्याचे झँडी म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|प्यारे जिया खान यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह विधानांचा निषेध; संबंधितांवर कारवाईची मागणी
07:05
Video thumbnail
शेतकऱ्यांचे दुःखाश्रू अन् कोरे निवेदन! नीलमताई गोऱ्हे यांच्यासमोर मांडली दुष्काळाची भीषणता
01:37
Video thumbnail
Latur|दुष्काळग्रस्त भागात चाऱ्याची तातडीने व्यवस्था करा; नीलम गोऱ्हेंची मागणी
04:01
Video thumbnail
Latur|भाजप नगरसेविकेच्या अतिक्रमणाविरोधात ठिय्या; भाजप कार्यकर्त्यांचाच आंदोलनात सहभाग!
03:17
Video thumbnail
Bashir Shaikh|बशीर शेख प्रकरणाची एसआयटी चौकशी करा; लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
05:43
Video thumbnail
ज्या जनावरांनी शेतात साथ दिली, त्यांनाच विकायची वेळ; जळकोटमधील शेतकऱ्यांची व्यथा
02:30
Video thumbnail
Latur|राहुल गांधींसह नेत्यांवरील कारवाई; शिरूर अनंतपाळमध्ये काँग्रेसचा निषेध
00:41
Video thumbnail
Nana Patekar passed away |नाट्य कलाकारांचा नटसम्राट हरवला;नाट्य क्षेत्रात शोककळा
07:57
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथमध्ये शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; ना पीक, ना चारा-पाणी!
03:17
Video thumbnail
Latur|मध्यरात्री दारूच्या नशेत तरुणांचा बेधुंद राडा; एकाचं बोट तोडलं!
01:54
Video thumbnail
Bashir Shaikh|न्यायालयाच्या आवारातच बशीर शेखला मारहाण; सामाजिक कार्यकर्त्यांचा संताप
02:27
Video thumbnail
Latur|बशीर शेखसह गंभीर गुन्हेगारांचं वकीलपत्र घेऊ नका; लातूर जिल्हा वकील मंडळाचं आवाहन
06:34
Video thumbnail
Latur|फरार बशीर शेखला अखेर बेड्या; बार्शीतून लातूर पोलिसांनी घेतलं ताब्यात
03:24
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31

Latest news