26.7 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeराष्ट्रीयआरक्षण म्हणजे मागे राहिलेल्यांना समानता देणे

आरक्षण म्हणजे मागे राहिलेल्यांना समानता देणे

नवीन लोकांसाठी मार्ग बंद करणे नाही माजी सरन्यायाधीश गवई यांचे मत

मुंबई : देशाचे माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी अनुसूचित जाती (एससी) आरक्षणात क्रीमी लेयर लागू करण्याबद्दल बोलले, तेव्हा त्यांना त्यांच्याच समाजातील लोकांकडून तीव्र टीकेला सामोरे जावे लागले.

माजी सीजेआय गवई मुंबई विद्यापीठात आयोजित एका व्याख्यानात बोलत होते. यावेळी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहताना म्हणाले, आंबेडकरांच्या मते, आरक्षण असे होते जसे एखाद्या मागे राहिलेल्या व्यक्तीला सायकल देणे, जेणेकरून तो इतरांच्या बरोबरीने येऊ शकेल. माजी सीजेआय पुढे म्हणाले की, याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती नेहमी सायकलवरच फिरत राहील आणि नवीन लोकांसाठी मार्गच बंद होईल. उखक किंवा मुख्य सचिवांच्या मुलाला आणि ग्रामपंचायत शाळेत शिकणा-या मजुराच्या मुलाला एकाच मापदंडाने मोजले जाऊ शकते का?

न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये आरक्षण नाही
माजी सरन्यायाधीश बीआर गवई यांनी सांगितले की, इंदिरा साहनी प्रकरणात क्रीमी लेयर सिद्धांत निश्चित करण्यात आला होता आणि एका निर्णयात त्यांनी स्वत: म्हटले होते की हा सिद्धांत अनुसूचित जाती (एससी) वर्गालाही लागू व्हायला हवा.

क्रीमी लेयरवर केले मत व्यक्त
गवई म्हणाले यावर काही लोकांनी आरोप केला की ते स्वत: आरक्षणाचा लाभ घेऊन सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि आता क्रीमी लेयरबद्दल बोलत आहेत. परंतु उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये आरक्षण नसते म्हणून हा आरोप तथ्यहीन आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR