21.7 C
Latur
Wednesday, February 11, 2026
Homeराष्ट्रीयरोहित शर्मा, हरमनप्रीत कौरचा पद्मश्रीने गौरव

रोहित शर्मा, हरमनप्रीत कौरचा पद्मश्रीने गौरव

मनोरंजन क्षेत्रातून आर माधवनला पद्मश्री

नवी दिल्ली : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र सरकारने नागरी पुरस्कारांची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाची वर्ल्ड कप विजेती कॅप्टन जोडी रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांच्यासह लोकप्रिय अभिनेता आर. माधवन यास २०२६ चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा आणि महिला संघाची धडाकेबाज कर्णधार हरमनप्रीत कौर यांना क्रिकेटमधील अतुलनीय योगदानासाठी हा सन्मान मिळाला आहे. तसेच, पॅरा अ‍ॅथलीट प्रवीण कुमार आणि टेनिस दिग्गज विजय अमृतराज(पद्मभूषण) यांचाही गौरव करण्यात आला आहे.

चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणा-या आर. माधवन यांना पद्मश्री जाहीर झाला आहे. त्यांच्यासोबतच बंगाली चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार प्रसेनजित चॅटर्जी यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

प्रशासकीय आणि शैक्षणिक योगदान
यूजीसीचे माजी अध्यक्ष ममिदला जगदेश कुमार आणि प्रसार भारतीचे माजी सीईओ शशी शेखर वेम्पती यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवा आणि प्रशासकीय कामासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांच्या घोषणेमुळे क्रीडा, कला आणि शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून सर्वच स्तरातून या मान्यवरांचे अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR