२९ ऑक्टोबरपर्यंत शेतक-यांच्या खात्यात जमा होणार ५ हजार रुपये ; मंत्रीमंडळाचा शेतक-यांसाठी मोठा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र सध्या महादुष्काळात होरपळत आहे. त्यामुळे सरकारकडून मदतीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १४ ऑक्टोबरला शेतक-यांना ५ हजार रुपये मदत करणार असल्याची घोषणा केली होती. या संदर्भात आजच (२७ ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेत ५ हजार रुपये अग्रीम म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय ही रक्कम दोन दिवसांत शेतक-यांच्या खात्यात जमा केली जाईल, हेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये जमा होतील आणि दुष्काळात होरपळणा-या शेतक-यांना दिलासा मिळेल, अशी सरकारला अपेक्षा आहे.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या सवलती देण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण शेतक-यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतक-यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. शिवाय तोंडावर दिवाळीचा सण आहे. त्यामुळे शेतक-यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपये देण्याची घोषणा सरकारने दोन आठवड्यांपूर्वी केली होती. त्याचा निर्णय आजच्या (२७ ऑक्टोबर) मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शेतक-यांना दोन दिवसांत म्हणजे गुरुवारपर्यंत (२९ ऑक्टोबर) शेतक-यांच्या खात्यात ५ हजार रुपये अग्रीम म्हणून जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

बँकांना वजावट न करण्याचे आदेश
शेतक-यांना देण्यात येणा-या अग्रीम ५ हजार रुपयांचा लाभ राज्यातील दीड कोटी शेतक-यांना मिळणार आहे. त्यासाठी सरकार ७ हजार ५०० कोटी रुपये खर्च करणार आहे. ही रक्कम दोन दिवसांत शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा होणार असून फार्मर आयडी असलेल्या शेतक-यांच्या खातात रक्कम जमा होणार. ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाहीत त्यांना केवायसी करावी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे बँकांना अग्रीम रकमेतून वजावट न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
PURNA| तालुक्यातील निळा-महागाव रस्त्याचा प्रश्न मार्गी|आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
03:59
Video thumbnail
Latur Bus Stand Dirty Condition | मध्यवर्ती बसस्थानकात घाणीचे साम्राज्य | एकमत डिजिटल
02:32
Video thumbnail
Latur Gandhi Chowk Police Station | सलग पाचव्यांदा जिल्ह्यात प्रथम क्रमांक | एकमत डिजिटल
02:56
Video thumbnail
Latur Surya Dakshin Hotel Controversy | MR संघटनांची पोलिसांत तक्रार
02:45
Video thumbnail
Nanded Sachkhand Gurudwara Takht Snan | तख्त स्नानने दिवाळी पर्वाला सुरुवात
02:47
Video thumbnail
Latur|सूर्या दक्षिण हॉटेल मालकाच्या वक्तव्यावरून MR संघटना आक्रमक | निषेध आणि माफीची मागणी
04:04
Video thumbnail
Latur District Bank|आमचा दृश्यम नव्हे, शुद्ध रामायण” | धिरज देशमुख यांची विरोधकांवर सडेतोड टोला
05:39
Video thumbnail
LIVE -लातूर जिल्हा बँक निवडणुकीत सहकार पॅनलचा शंखनाद! बाबासाहेब पाटील, धीरज देशमुख मैदानात
01:40:24
Video thumbnail
LIVE "लातूर बँकेत मोठी राजकीय खेळी! बाबासाहेब पाटील अन् धीरज देशमुख एकत्र!"
01:03:28
Video thumbnail
Mahur|एमटीडीसी रस्ते बांधकामावर भीषण दुर्घटना | २० वर्षीय मजुराचा मिक्सर मशीनखाली मृत्यू
01:33
Video thumbnail
Latur|कुरियर बॉक्स स्फोटातील नागनाथ स्वामी यांचा मृत्यू | पाच दिवसांची झुंज संपली
02:44
Video thumbnail
Latur|मनपात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन | किमान वेतन आणि दिवाळी बोनसची मागणी
03:57
Video thumbnail
Latur Diwali Travel Ticket Rates|खासगी बसकडून अवाजवी तिकीट दर आकारल्यास तक्रार करा | RTO चे आवाहन
02:55
Video thumbnail
Latur Loan Recovery|कर्जवसुलीच्या छळातून आत्महत्येचा आरोप; सावकार शहाणवाज पठाण अटकेत
03:39
Video thumbnail
Nanded Loan Recovery|दुष्काळात कर्जवसुलीला छावा संघटनेचा विरोध | चिंचोली गावातील घटना
04:55

Latest news