रशिया ठरला भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार

नवी दिल्ली : जागतिक ऊर्जा बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीत मोठी वाढ केली आहे. रशियासोबतचभारताने संयुक्त अरब अमिरातीकडून(यूएई) देखील तेल खरेदीचा वेग वाढवला आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ पूर्ववत सुरू होण्यापूर्वी आणि आखाती देशांतून पुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्याआधी, देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असावा यासाठी भारतीय रिफायनरीजनी जून महिन्यात ही आक्रमक खेदी सुरू केल्याचे ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

केपलर या संस्थेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, चालू जून महिन्यात १९ तारखेपर्यंत भारताने रशियाकडून सरासरी २६.६ लाख बॅरल प्रतिदिन कच्च्या तेलाची आयात केली आहे. मे महिन्यात हा आकडा १९.१ लाख बॅरल प्रतिदिन इतका होता. या मोठ्या वाढीसह रशिया हा भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश बनून राहिला आहे. दुसरीकडे, भारताने जूनमध्ये वअए कडून ६.३६ लाख बीपीडी कच्च्या तेलाची आयात केली आहे, जी मे महिन्यातील ६.४४ लाख बीपीडी या विक्रमी पातळीच्या अगदी जवळ आहे. तर सौदी अरेबियाकडून झालेली आयात ३.८४ लाख बॅरल प्रतिदिन राहिली. याशिवाय, व्हेनेझुएलाकडून होणा-या आयातीतही लक्षणीय वाढ झाली आहे. जूनमध्ये व्हेनेझुएलाकडून ३ ते ४ लाख बॅरल प्रतिदिन आयात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या २.०९ लाख बॅरल प्रतिदिन आयातीसह व्हेनेझुएला भारताचा चौथा सर्वात मोठा तेलपुरवठादार बनला आहे.

अमेरिकेकडून आयातीत मोठी घट
रशिया आणि यूएईकडील खरेदी वाढत असताना अमेरिकेकडून होणा-या कच्च्या तेलाच्या आयातीत मोठी घट झाली आहे. जूनमध्ये अमेरिकेकडून भारताची आयात केवळ ९१ हजार बॅरल प्रतिदिन राहिली, तर मे महिन्यात हा आकडा २.५२ लाख बॅरल प्रतिदिन होता. यावरून भारताची ऊर्जा आयात धोरणे केवळ एका देशावर अवलंबून न राहता विविध स्रोतांवर आधारित असल्याचे स्पष्ट होते.

एलपीजी पुरवठ्यात अमेरिकेची भूमिका वाढली
ऊर्जा क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे एलपीजी पुरवठ्यात अमेरिकेची वाढती भूमिका. खाडी देशांमधून होणा-या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानंतर अमेरिका भारतासाठी प्रमुख एलपीजी पुरवठादार म्हणून उदयास आली आहे. यामुळे पुरवठ्याचे विविधीकरण वाढले असले तरी, अमेरिकेपासूनचे अंतर जास्त असल्याने वाहतूक खर्चात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीमुळे वाढली चिंता
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा आयातदार देश आहे. कच्चे तेल, एलएनजी आणि एलपीजीच्या गरजांसाठी भारत मोठ्या प्रमाणावर खाडी देशांवर अवलंबून आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या कारवाईनंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणा-या वाहतुकीवर निर्बंध आणल्याने जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता. जगातील सुमारे २० टक्के तेल वाहतूक या महत्त्वाच्या जलमार्गातून केली जाते. अमेरिका-इराण संघर्षविरामानंतर गेल्या आठवड्यापासून तेलवाहू जहाजांची वाहतूक पुन्हा सुरू झाली असली तरी हा संघर्षविराम किती काळ टिकेल, याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|महेश बिडगर मारहाण प्रकरण; न्यायाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा गंगाखेड बंद, ठिय्या आंदोलन
01:37
Video thumbnail
Latur|११ कार्यालये एकाच छताखाली; लातूरला मिळणार आधुनिक सहकार भवन
08:16
Video thumbnail
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट पलटली, १५ जणांचा मृत्यू
00:39
Video thumbnail
NANDED|नांदेड अतिक्रमण कारवाईत गोंधळ; जेसीबीच्या धडकेत व्यक्ती जखमी, पोलिसांचा बळाचा वापर
02:10
Video thumbnail
Nanded|कोसळलेल्या पुलाची आमदार आनंद बोंढारकरांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना खडे बोल
02:06
Video thumbnail
Latur|खंडापूर देणगी अपहार प्रकरणात किशोर शिवणीकर अटकेत; दीड कोटींच्या बंगल्यातून एलसीबीची कारवा
05:16
Video thumbnail
Latur|आरक्षणावर नवा फॉर्म्युला! 'अ, ब, क, ड' ऐवजी दोनच गटांची मागणी
03:06
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये सहकार संकुलाचे भूमिपूजन; ११ कार्यालये येणार एकाच छताखाली
03:00
Video thumbnail
Latur|केबल चोरीच्या संशयावरून तीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण! #breakingnews
01:21
Video thumbnail
Parbhani|महापौरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर संताप; कठोर कारवाईची मागणी
01:52
Video thumbnail
SOLAPUR|ओंकार शुगरजवळ भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, वडील-मुलगी गंभीर जखमी
01:26
Video thumbnail
Solapur|कुर्डूवाडी बार्शी रोडवर ओंकार शुगर जवळ भीषण अपघात एक जागीच ठार #Marathinews #accidentnews
00:36
Video thumbnail
Big Breaking News|खंडापूर प्रकरणात मोठा ट्विस्ट; अखेर पिस्तुल्या महाराज अटकेत
01:07
Video thumbnail
Latur|शिवीगाळ पडली महागात! ड्रायव्हर-कंडक्टरने तरुणाला दिला चोप #breakingnews
00:53
Video thumbnail
प्रा. विठ्ठल कांगणे यांचे तुफान भाषण; विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष
27:52

Latest news