23.1 C
Latur
Tuesday, July 8, 2025
Homeराष्ट्रीयसाक्षी मलिकची सरकारकडे संरक्षणाची मागणी

साक्षी मलिकची सरकारकडे संरक्षणाची मागणी

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतर मैदानावरवर साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया या कुस्तीपटूंच्या विरोधात काही कुस्तीपटू निदर्शने करत आहेत. ज्युनियर खेळाडूंचे १ वर्ष वाया गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, साक्षी मलिकने पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर आणि त्यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप केले आहेत. बृजभूषण यांचे समर्थक तिला फोन करून धमकावत असल्याचा आरोप तिने केला असून केंद्र सरकारकडे संरक्षणाची मागणी तिने केली आहे.

साक्षी मलिकने बुधवारी परिषदेत म्हटले की, बृजभूषण सिंगचे लोक माझ्या आईला धमकीचे फोन करत आहेत. आमची सुरक्षा सरकारची जबाबदारी आहे. बृजभूषणचे लोक पुन्हा सक्रिय झाले आहेत. आमच्या कुटुंबाला धमक्या येत आहेत. फेडरेशन रद्द करण्यावर ती म्हणाली की, संजय सिंग यांनी फेडरेशनमध्ये हस्तक्षेप करू नये. पुन्हा नवीन फेडरेशन आल्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही. सरकारने नवीन फेडरेशनच्या निलंबनाचे आम्ही स्वागत करतो. बृजभूषण आमच्यावर ज्युनियर खेळाडूंचे भविष्य बिघडवल्याचा आरोप करत आहेत, पण तसे नाही.

त्या म्हणाल्या की, आम्हाला नवीन महासंघाबाबत कोणतीही अडचण नाही. संजय सिंह या एकाच व्यक्तीच्या उपस्थितीमुळे अडचण निर्माण झाली होती. संजय सिंह शिवाय, आम्हाला नवीन फेडरेशन किंवा तदर्थ समितीशी कोणतीही अडचण नाही. सरकार आमच्यासाठी पालकासारखे आहे आणि मी त्यांना विनंती करेन की आगामी कुस्तीपटूंसाठी कुस्ती सुरक्षित करावी. संजय सिंह कसे वागतात ते तुम्ही पाहिले आहे. त्यांचा महासंघात हस्तक्षेप आम्हाला नको आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR