23.9 C
Latur
Monday, September 9, 2024
Homeमहाराष्ट्रबाजारात सिमेंटच्या लसणाची विक्री!

बाजारात सिमेंटच्या लसणाची विक्री!

जळगाव : प्रतिनिधी
स्वयंपाकघरात अत्यंत गरजेच्या असलेल्या लसणाचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. अशातच लसणाचा काळाबाजार करणारे, चक्क सिमेंटचे लसूण विकत आहेत. बाजारात सिमेंटच्या लसणाची विक्री होत आहे. या विचित्र फसवणुकीमुळे ग्राहक आश्चर्यचकित झाले आहेत.

अकोला शहरातील एका निवृत्त पोलिस कर्मचा-याच्या पत्नीने घरासमोर आलेल्या फेरीवाल्याकडून पावकिलो लसूण खरेदी केला. त्यामध्ये हुबेहूब लसणासारख्याच दिसणा-या लसणाच्या गाठी त्यांना दिसल्या. मात्र तो सोलला जात नसल्याने त्यांनी तो चाकूने कापला, तेव्हा सिमेंटला पांढरा रंग देऊन तयार केलेला तो बनावट लसूण असल्याचे उघड झाले. वजनात जास्त भरत असल्याने काळाबाजार करणारे अशी फसवणूक करत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

स्वयंपाकघरात अत्यंत गरजेच्या असलेल्या लसणाचे भाव गगनाला भिडले असून लसूण विकत घेणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. यातच काही लसणाचा काळाबाजार करणा-यांनी अजब शक्कल लढवीत नागरिकांची फसवणूक करण्याचे काम सुरू केले आहे.
अकोला शहरातील पोलिस विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सुभाष पाटील यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुधाकर पाटील यांच्या पत्नी यांनी त्यांच्या घरासमोर आलेल्या फेरीवाल्याकडून एक पाव लसूण विकत घेतला.

सकाळी भाजीकरिता लसूण सोलण्यासाठी घेतला असता यामधील एक लसणाची गाठ ही हुबेहूब ओरिजनल लसणासारखी दिसून आली मात्र ती आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करून बनवलेली होती. लसूण सोलताना त्याच्या पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या त्यामुळे सदर लसणाच्या गाठीला चाकूच्या सहाय्याने कापले असता ही गाठ सिमेंटपासून बनवली असून यावर पांढ-या रंगाचा वापर सुद्धा करण्यात आला आहे हे त्यांच्या लक्षात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR