समाजवादी पक्षाच्या अबु आझमींचा मविआला धक्का

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हिंदुत्त्वाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा आदेश शिवसैनिकांना दिल्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी प्रचंड नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अबु आझमी यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत दिले.

विधानसभा निवडणुकीत मविआने घटकपक्ष असलेल्या समाजवादी पक्षासाठी जागा सोडल्या होत्या. सपाचे अबु आझमी हे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा आणि रईस शेख हे भिवंडी मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अबु आझमी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले. तर दुसरीकडे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी कालच सोशल मीडियावरुन ठाकरे गटाच्या हिंदुत्त्ववादी भूमिकेचा विरोध केला होता. त्यामुळे आता समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार मविआतून बाहेर पडतील असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

मविआच्या सर्व आमदारांनी आज शपथ घेण्यास नकार देत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. मात्र, अबु आझमी यांनी मविआच्या भूमिकेशी फारकत घेत आमदारकीची शपथ घेतली. तर भिवंडीचे आमदार रईस शेख यांनीही आमदारकीची शपथ घेतली.

अबु आझमी यांनी मविआतून बाहेर पडण्याचे कारण सांगताना म्हटले की, मविआचा घटकपक्ष असलेला एक पक्ष म्हणतो की, आम्ही हिंदुत्त्वाच्या मुद्यावर कायम आहोत. उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर काम करा, असे कार्यकर्त्यांना सांगितले जाते. ६ डिसेंबरला बाबरी मशीद पाडणा-यांचे अभिनंदन केले जाते. अशा पक्षासोबत समाजवादी पार्टी राहू शकत नाही. त्यामुळे मी मविआसोबत राहीन, असे वाटत नाही. समाजवादी पक्ष सेक्युलर आहे, आम्ही कम्युनल भाषा करणा-या पक्षासोबत कसे राहणार?, असा सवाल अबु आझमी यांनी उपस्थित केला. तसेच मविआचा ईव्हीएम संदर्भातील मुद्दा पूर्णपणे मान्य नसल्याचेही त्यांनी म्हटले. पण निवडणूक आयोगाने ईव्हीएम संदर्भातील संशय दूर करावा, असे त्यांनी म्हटले.

आझमींवर बोेलणार नाही : प्रभू
अबु आझमी यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अबु आझमी यांनी समाजवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारून त्यांनी हा निर्णय घेतला असेल तर त्यावर मी काय बोलू? वरिष्ठ नेते या सगळ्या संदर्भातला निर्णय घेतील. महापालिका निवडणुका समोर आहेत एकत्र मिळून लढणार आहोत. मात्र, समाजवादी पक्ष वेगळी भूमिका घेत असेल तर बघू, असे सुनील प्रभू यांनी म्हटले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news