23.1 C
Latur
Friday, October 11, 2024
Homeमहाराष्ट्र‘वंदे भारत’च्या तिकिटविक्रीत सांगलीचा विक्रम

‘वंदे भारत’च्या तिकिटविक्रीत सांगलीचा विक्रम

सांगली : प्रतिनिधी
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसवर सांगलीकर प्रवाशांनी भरभरून प्रेम व्यक्त करीत तिकिटविक्रीचा मोठा विक्रम नोंदविला. बुकिंगच्या पहिल्याच दिवशी सांगली-पुणे व पुणे-सांगली या मार्गावर वंदे भारतच्या दोन गाड्यांमध्ये एकूण १७५ तिकिटे सांगलीकरांनी काढली.

हुबळी-सांगली-पुणे वंदे भारत गाडीत पहिल्या दिवशी सांगली स्थानकापासून शंभर तिकिटांची विक्री झाली. गाडी (क्र. २०६६९) हुबळी-सांगली-वंदे भारत गाडीत सांगली स्टेशनवरून सकाळी सहा वाजेपर्यंत ९० तिकिटे विकली गेली. सकाळी ७ ते सव्वा नऊच्या दरम्यान सांगली स्टेशनवरून वंदे भारत सुटण्याच्या आधी करंट बुकिंगमध्ये आणखी दहा ते बारा तिकिटे विक्री झाली.

पहिल्याच दिवशी वंदे भारत गाडीने सांगली रेल्वे स्थानकावरून एकाच फेरीत शंभर तिकिटांची विक्री पार केल्यामुळे एक नवा विक्रम सांगलीच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याचबरोबर पुणे-सांगली-कोल्हापूर वंदे भारत गाडीत पुणे ते सांगली या परतीच्या मार्गावर ७५ तिकिटांची विक्री झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR