मुंबई : बॉलिवूडचा दमदार अभिनेता संजय दत्तचा आज वाढदिवस आहे. संजू बाबा आज ६५ वर्षांचा झाला. या निमित्ताने त्यांची पत्नी मान्यता दत्तने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर संजू बाबाचे चाहते देखील त्याला सोशल मीडियावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील शक्तिशाली जोडपे सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या पोटी जन्म घेतलेल्या संजू बाबाने लहान वयातच अभिनयाला सुरुवात केली आणि रॉकी चित्रपटामुळे तो रातोरात स्टार झाला. आज संजू बाबा करोडो रूपयाचा मालक आहे.
संजू बाबाने बालकलाकार म्हणून ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटात दिसला होता. तर अभिनेता म्हणून त्याचा पहिला चित्रपट १९८१ मध्ये आलेला ‘रॉकी’ हा होता, या चित्रपटामुळे संजू रातोरात स्टार बनला होता.मागील ४५ वर्षांपासून तो बॉलिवूडचा एक भाग आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यादरम्यान, त्यांनी साऊथ सिनेमातही काम केले आहे. संजू बाबा हे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार्सपैकी एक आहे. हा अभिनेता करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे.
किती संपत्तीचा मालक आहे संजू बाबा ?
मिळालेल्या माहितीनुसार, संजयची एकूण संपत्ती ३०० कोटी रुपये असून, संजूबाबा मुंबईतील इम्पीरियल हाइट्स नावाच्या आलिशान इमारतीचा मालक आहे. यामध्ये तो पत्नी मान्यता आणि दोन मुलांसोबत राहतो. संजू बाबाच्या फीबद्दल बोलायचे झाले तर तो एका चित्रपटासाठी ८ ते ९ कोटी रुपये घेतो. त्यांच्या पहिल्या पत्नीची एक मुलगी त्रिशला दत्त अमेरिकेत राहते. प्रॉपर्टी व्यतिरिक्त संजय दत्तकडे लक्झरी कारचे कलेक्शन आहे. ज्यामध्ये ऑडी क्यू ७ पासून मर्सिडीजपर्यंत अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
संजय दत्तचे आगामी चित्रपट
संजय दत्ता आगामी अनेक चित्रपटात काम करत असून, प्रक्षेक त्याची आतूरतेने वाट पहात आहेत. या चित्रपटामध्ये प्रामुख्याने ‘वेलकम टू द जंगल’, ‘बाप’ , ‘द गुड महाराजा’, ‘गुलडछडी’ या चित्रपटांचा समावेश आहे. यासोबतच तो ‘संजू बाबा डबल आय स्मार्ट ’ या चित्रपटातून तेलुगू सिनेमात पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाध यांनी केले आहे. तर कन्नड चित्रपट ‘केडी-द डेव्हिल’ या चित्रपटात देखील काम करत आहे. यासोबतच संजू बाबा ‘मास्टर-ब्लास्टर’ या चित्रपटात देखील काम करत असून या चित्रपटात टायगर श्रॉफही दिसणार आहे. फिरोज नाडियादवाला हा चित्रपट बनवत आहेत.