निलंगा : येथील रहिवासी सतीश सुभाष कोरके, नोकरीपेशा एसटी बस चालक (वय ५० वर्षे) रा. खारवणी गल्ली निलंगा यांचे अल्पशा आजाराने अकाली निधन झाले असून त्यांच्या जाण्याने कोरके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण परिसरात अत्यंत शोककुळा वातावरण निर्माण झाले आहे. आयुष्याच्या पन्नाशीतच एका उमद्या आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्वाचा असा अचानक निरोप घेणे प्रत्येकाच्या काळजाला घर पाडून गेले आहे.
सतीश कोरके यांच्या पश्चात त्यांची वृद्ध माता, पत्नी, पितृछत्राला पारखी झालेली एक मुलगी व एक मुलगा, सुख-दु:खात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे तीन भाऊ आणि मायेची पाखर घालणा-या दोन विवाहित बहिणी असा मोठा परिवार आहे. आपल्या घरातील कर्ता पुरुष, लाडका लेक, प्रेमळ पती आणि आदर्श पिता असा अचानक सोडून गेल्यामुळे कुटुंबाचा मुख्य आधारच निखळला आहे. सतीश कोरके यांच्या पार्थिवावर बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक १०:३० वाजता निलंगा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अन्त्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
















