23.9 C
Latur
Monday, September 9, 2024
Homeराष्ट्रीयतुरुंगात पाठवा पण पत्नीकडे नको, पतीचा आर्तटाहो

तुरुंगात पाठवा पण पत्नीकडे नको, पतीचा आर्तटाहो

त्रासाला कंटाळलेला पती घरून पळाला

बंगळुरू : बंगळुरूहून पळून नोएडाला आलेला एक व्यक्ती मॉलमध्ये चित्रपट पाहून बाहेर पडला. तितक्यात पोलिसांनी त्याला पकडले. त्याला राग अनावर झाला तेव्हा तो म्हणाला की, मला तुरुंगात टाका, पण मला माझ्या पत्नीकडे पाठवू नका. हे उत्तर ऐकून पोलिसही अवाक झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित इंजिनिअर व्यक्ती बसने तिरुपतीला गेला, त्यानंतर ट्रेनने भुवनेश्वरला पोहोचला. तिथून दिल्लीला आला, नंतर नोएडाला गेला.

आपला पती बेपत्ता झाल्याची माहिती पत्नीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. तसेच पतीला शोधण्यात पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोपही तिने केला. पतीचे अपहरण झाल्याचा तिला संशय होता. सुरुवातीला पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. त्या व्यक्तीने आपला मोबाईल बंद केला होता. पोलिसांनी बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज तपासले, मात्र त्यातही काहीच हाती लागले नाही.

पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या अभियंत्याने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी त्याला खूप त्रास देते. मी तिचा दुसरा नवरा आहे. तीन वर्षांपूर्वी मी तिला भेटलो तेव्हा तिचा घटस्फोट झाला होता. ती १२ वर्षांच्या मुलीची आई आहे. माझे हे पहिलेच लग्न होते. आम्हाला आठ महिन्यांची एक मुलगीही आहे. ती मला खूप बंधने घालते. मी एकटा चहा देखील प्यायला जाऊ शकत नाही. जेवताना भाताचा कण, भाकरीचा तुकडा पडला तरी खूप ऐकावे लागते. तिच्या इच्छेनुसारच मला कपडे परिधान करावे लागतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR