मुंंबई : ‘दबंग’ आणि ‘बेशरम’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडमधील एका सुपरस्टारवर टीका केली आहे. अभिनेता सलमान खानवर गंभीर आरोप केल्यानंतर, अभिनव यांनी आता शाहरुख खानवर थेट हल्ला चढवला आहे. शाहरुख खानने भारत सोडून दुबईतील त्याच्या घरी राहायला जावे असे विधान अभिनव कश्यप यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
बॉलिवूड ठिकाणाला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनव कश्यप यांनी शाहरुख खानसंबंधी वक्तव्य केले आहे की शाहरुख खानच्या दुबईतील घराला ‘जन्नत’ म्हणतात, तर मुंबईतील घराला ‘मन्नत’ म्हणतात. याचा अर्थ काय आहे? तुझ्या सर्व मन्नत इथे पूर्ण झाल्या तरीही तू नवीन मन्नत मागत आहेस. तो त्याचे बंगल्यामध्ये आणखी दोन मजले वर वाढवत आहे असे मी ऐकले आहे. त्यामुळे एकूणच त्याच्या इच्छा आणि मागणी वाढत आहेत. पण जर तुमचे जन्नत दुबईत असेल, तर तुम्ही भारतात काय करत आहात?
अभिनव कश्यप यांनी शाहरुख खानच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि ते म्हणाले या लोकांना आपण काय म्हणायचे? या लोकांनी सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर स्वत:चे महाल उभे केले आहेत. त्यांची नेटवर्थ किती आहे, याच्याशी मला काय देणेघेणे आहे? तुम्ही मला खायला देता का? शाहरुख खान बोलण्यात हुशार असेल, पण त्याचा हेतू चुकीचा आहे असे मला वाटते. त्यामुळेच तो सिनेमांमध्ये ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ असे डायलॉग्स मारतो.

