21.6 C
Latur
Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रशीतल तेजवानीला ७ दिवसांची पोलिस कोठडी

शीतल तेजवानीला ७ दिवसांची पोलिस कोठडी

पिंपरी : मुंढवा येथील ४० हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणातील संशयित शीतल किशनचंद तेजवानी(४५) हिला मंगळवार दि. १६ डिसेंबर रोजी बावधन पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. पौड न्यायालयाने तेजवानी हिला ७ दिवस म्हणजेच मंगळवार दि. २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया इंटरप्रायजेस एलएलपी कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार पत्र असलेली शीतल तेजवाणी आणि दस्त नोंदणी करणारे सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू या तिघांविरुद्ध याप्रकरणात बावधन पोलिस ठाण्यात ६ नोव्हेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या या प्रकरणातील संशयित रवींद्र तारू हा १९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत आहे. तसेच, या गुन्ह्यातील तिसरा संशयित दिग्विजय पाटील याचीही बावधन पोलिसांनी सोमवारी ९ तास कसून चौकशी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR