26.3 C
Latur
Thursday, July 10, 2025
Homeसोलापूरमोडनिंबच्या कला केंद्रात गोळीबार; वेळापूरच्या एकाविरुध्द गुन्हा दाखल

मोडनिंबच्या कला केंद्रात गोळीबार; वेळापूरच्या एकाविरुध्द गुन्हा दाखल

टेंभुर्णी – मोडनिंब येथील राधिका कला केंद्रामधील नृत्यांगनांना शिवीगाळ दमदाटी करीत असताना कला केंद्राच्या बाहेर जा, कला केंद्राच्या ठिकाणी वाद करू नका, असे म्हणणाऱ्या कला केंद्रमालकाच्या मुलाला ठार मारण्याच्या उद्देशाने रोखलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून छताला लागली. यामुळे खळबळ उडाली. ही घटना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत विनोद किसन जाधव ( वय ३२, रा. अरण, ता. माढा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन निखिल बाळू चव्हाण (रा. वेळापूर, ता. माळशिरस) याच्याविरुध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार झाला आहे. मोडनिंब येथे फिर्यादीचे वडील किसन कुंडलिक जाधव यांच्या मालकीचे राधिका कला केंद्र आहे. या कला केंद्रामध्ये एकूण चार पार्या असून त्यामध्ये २८ नृत्यांगना व पुरूष कलाकार नृत्य, गायन वाजविण्याचे काम करतात. राधिका कला केंद्रामध्ये पार्टी लावण्यासाठी दररोज वेगवेगळे लोक येतात. सायंकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत कलाकेंद्र सुरू असते. निखिल चव्हाण हा नेहमी कला केंद्रामध्ये येत होता. हिना अर्जुन मुसळे (रा. परिते, ता. माढा) ही त्याची मैत्रीण आहे. राधिका कला केंद्रामधील रूममध्ये रात्री अकरा वाजल्यापासून हिना मुसळे यांची बारी (पार्टी) चालू होती. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास निखिल चव्हाण व त्याचे दोन मित्र हे त्यांच्याकडील कारमधून राधिका केंद्रावर आले.

कला त्यावेळी निखिल याने फिर्यादीस हिना कोठे आहे. तिची बारी कोठे चालू आहे असे विचारले, तेव्हा त्याठिकाणी जाऊन त्याने वादविवाद करण्यास सुरूवात केली. तसेच नृत्य करीत असलेल्या नृत्यांगनांना शिवीगाळ, दमदाटी करू लागले. त्यावेळेस फिर्यादीने तेथे जाऊन निखिल यास वादविवाद करू नका, आमचे नुकसान होत आहे असे म्हणाले असता त्याने त्याच्या जवळील रिव्हॉल्व्हर काढून तू कोण सांगणार, तुला खलास करतो म्हणून ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीवर रोखून धरली. तेवढ्यात रूममधील कोणीतरी नृत्यांगणाने त्याच्या हाताला धरल्याने त्याच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून ती रूममधील छताला लागली. गोळीबाराचा आवाज झाल्याने कलाकेंद्रातील नृत्यांगणा व बारी पाहण्यास आलेल्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर निखिल याने हातातील रिव्हॉल्व्हर हवेत धरून मोठ्याने आरडाओरड करून दमदाटी करून तिघेजण कला केंद्र येथून कारमधून निघून गेले.

या घटनेची माहिती समजताच अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नालकुल, टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. विनोद जाधव यांनी निखिल चव्हाण याच्याविरुध्द टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश चंदनशीव करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR