20.7 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रसुप्रिया सुळे यांच्या पत्रिकेत राजयोगाची चिन्हे!

सुप्रिया सुळे यांच्या पत्रिकेत राजयोगाची चिन्हे!

मुंबई : विशेष प्रतिनिधी
सध्या राज्यातील राजकारण अवघड वळणावर आहे. त्याचा कल कोणत्या दिशेकडे झुकतो याचा अंदाज बांधणे अवघड आहे. राजकीय विश्लेषक, तज्ज्ञ यांना सूर गवसला नसला तरी काही ज्योतिषांनी काही ठोकताळे वर्तवले आहेत. राज्यातील प्रमुख नेत्यांच्या ग्रहस्थितीवरून त्यांनी काही अंदाज मांडले आहेत. तथापि, सुप्रिया सुळे यांच्या पत्रिकेत तूर्त तरी राजयोगाची चिन्हे दिसत आहेत. अर्थातच हा अंदाज आहे.

अजित पवार यांच्या पत्रिकेत राहु-शनि मुक्कामाला
अजित पवार यांनी वर्षांपूर्वी बंडाचे निशाण हाती घेतले आणि राष्ट्रवादीसह ते महायुतीत डेरेदाखल झाले. अजितदादांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी दुपारी १ वाजून ४२ मिनिटांनी, अहमदनगर येथे झाला होता. तुला लग्नात त्यांच्या कुंडलीत मे २०२३ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत बुधात विंशोत्तरी दशा सुरू आहे. बुध नवव्या (भाग्य) आणि बाराव्या (नुकसान) भावात आहे. त्याच काळात त्यांनी जुलै २०२३ मध्ये भाजपला जवळ केले. पण त्याचवेळी लोकसभेत त्यांना प्रभाव दाखवता आला नाही. अजित पवार राज्यात ५३ विधानसभा मतदारसंघात नशीब आजमावत आहेत. अजितदादांच्या तुळ राशीत बुध राशीतील केतूचा कठीण काळ २ नोव्हेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान आहे. अजित पवार यांच्या मागे साडेसाती सुरू असल्याचे दिसून येते.

देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीत कोणता प्रयोग?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणाला वेगळी दिशा दिली. त्यांच्या ऑपरेशन लोट्समुळे राज्यात दोन पक्षांची भर पडली. त्यांनी महायुतीसाठी बेरजेचे राजकारण केले. पण असे करताना त्यांना अनेक ठिकाणी तडजोड करावी लागली. त्यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी नागपूर येथे झाला. कन्या लग्नाची पत्रिका आहे. लाभाच्या एकादश भावात बुधामुळे त्यांना २०१४ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता आले. तर डिसेंबर २०१८ ते २०२५ पर्यंत फडणवीस यांच्या कन्या राशीत नुकसानदायक केतूची महादशा सुरू आहे. इतकेच नाही तर कुंभेच्या चंद्रावर शनीचे संक्रमण सुरू आहे. त्यांच्या पत्रिकेत साडेसाती प्रकोप दिसत आहे.

उद्धव ठाकरे यांना ग्रहांचा कोणता संदेश?
उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी सकाळी १० वाजून १४ मिनिटांनी मुंबईत झाला. जन्म राशी कन्या असून चंद्र राशी सिंह आहे. जन्म लग्नात गुरू आणि बुध यांनी ठाण मांडल्याने त्यांना बळ मिळाले आहे. गुरूमध्ये केतूच्या दशेने त्यांना २०१९ मध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री असताना त्यांची ग्रहांनी परीक्षा घेतली. २०२२ मध्ये त्यांच्या पत्रिकेतील शुक्राच्या षडाष्टक दशेमुळे पक्षात उभी फूट दिसून आली. पक्ष, चिन्ह हातचे गेले. सद्यस्थितीत गुरू ग्रहातील चंद्राची शुभ विंशोत्तरी दशा एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे. शनि हा गुरू राशीतून धनुमधून मार्गक्रमण करत तुळा राशिच्या नवमांशात आहे. त्यामुळे ग्रहांचे झुकते माप त्यांच्या पदरात दिसून येत आहे.

सुप्रिया सुळे यांना राजयोगाची चिन्हे?
सुप्रिया सुळे यांचा जन्म ३० जून १९६९ रोजी सकाळी ११ वाजता पुण्यात झाला. सध्या त्या लोकसभेच्या सदस्य आहेत. त्यांच्या पत्रिकेत अनेक चांगल्या ग्रहांची बैठक पक्की होत आहे. बुध, मंगळ यांचे बळ त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या नवांश आणि दशमांश पत्रिकेतील गुरू राशीत बुधाची विंशोत्तरी दशा अत्यंत शुभ स्थानी आहे. त्यांच्या पत्रिकेत राजयोगाची चिन्हे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR