22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeसोलापूरअपघाताचा बनाव करीत जागा मालकाच्या मुलाचा खून

अपघाताचा बनाव करीत जागा मालकाच्या मुलाचा खून

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : हॉटेलची जागा खाली करण्यास सांगितल्यामुळे जागा मालकाच्या मुलाच्या कारला धडक देऊन खून केल्याप्रकरणी लक्ष्मी टाकळीतील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत रविकांत प्रतापसिंह पाटील याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूप्रकरणी परमेश्वर देठे, त्यांची दोन मुले रणजित व प्रशांत, पुतण्या नितीन दिगंबर देठे व हॉटेल कामगार विजय बलभीम कोळेकर (रा. कोर्टी) यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, परमेश्वर देठे यांचा लक्ष्मी टाकळी येथे वैभवराज धाबा आहे. जागेचे मालक प्रतापसिंह पाटील यांनी त्यांना कराराप्रमाणे दिलेली जागा खाली करण्याचे सांगितले होते. यावरून दोन्ही कुटुंबांत जोरदार वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी देठे यांना मारहाणदेखील झाली होती. दरम्यान देठे यांनी रविकांत -पाटीलवर पाळत ठेवली होती.

मंगळवारी सकाळी रविकांत पाटील हे दुचाकी (एमएच १३ सीएच ९६९२) वरून देगावमार्गे सोलापूरकडे निघाले होते. दरम्यान त्याच्यावर पाळत ठेवणाऱ्यांच्या कार (क्र. एमएच १४ सीएस ७३५१)ने त्यास पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात २०० फूट फरपटत नेत अपघात असल्याचे भासवत खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अधिक तपासामध्ये हा खून झाला असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे तालुका पोलिसांनी त्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या